आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 104 Year Old Man Marries 45 Year Old Beloved, Divya Marathi, Ranchi

106 वर्षांच्या आजोबाचा 45 वर्षांच्या प्रेयसीबरोबर विवाह, संपूर्ण गाव होते व-हाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन... लोग अक्सर गुनगनाते है, असे गझल जगजीत सिंह यांनी म्हटले आहे. या गझलीचे गोड्डामध्‍ये प्रत्यय आला आहे. सिजुआ गावमध्‍ये राहणारे 106 वर्षांचे आजोबा तारा टुडूने आपली 45 वर्षांची प्रेमिका असलेली बहामुनी मुर्मूबरोबर विवाह केला आहे.
तारा आणि बहामुनी दरम्यान 20 वर्षांपासून प्रेमप्रकरण चालू होते, असे स्थानिक लोकांनी सांगितले. बहामुनीने आपले घर सोडले होते व ती ताराबरोबर राहत होती. या प्रदीर्घ 'लिव्ह-इन- रिलेशन' दरम्यान त्यांना चार मुले झाली. दोघांनी विवाहासाठी पंचायतीकडे विनंती केली होती, असे पंचायतीचे प्रमुख मीरा टूडूंनी सांगितले. प्रियकर तारा टुडूच्या घरात नातवंडे आणि नातवंडांची मुले असा परिवार आहे. असे असतानाही कुटूंबांने टुडू यांच्यातील दीर्घसंबंध विचारात घेऊन त्यांच्या विवाहाला संमती दिली. या जगावेगळा विवाह पाहाण्‍यासाठी पूर्ण गावांने गर्दी केली होती. गावाचे प्रमुख विरसिंह मरांडी, सामाजिक कार्यकर्ता सियाराम सोरेन, कुटूंब आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.