आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 105 Year Old Woman Who Sold Her Goats Off To Build Toilet Appointed Mascot Of ‘Swachh Bharat Abhiyan’

‘कुंवरबाईला भीती, बक्षीसाचे दोन लाख चोरी झाले, कुणी मारून टाकले, विमानातून पडले तर..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धमतरी (छत्तीसगड) - १०५ वर्षीय कुंवर बाईने बकरी विकून शौचालयाचे बांधकाम केले होते. काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगड येथे आले असता त्यांनी मंचकावर बोलावून कुंवरबाईचा सन्मान केला होता. त्यांना चरणस्पर्शही केला होता. मंगळवारी सरकारने कुंवरबाईला स्वच्छता मिशनचे ब्रँड अम्बेसेडर बनवले. यासाठी त्यांना दोन लाख रुपये देण्यात येणार आहे. कुंवरबाईसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. जेव्हा त्यांना या रकमेविषयी कळले तेव्हापासून त्या अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनात विचार येतो की, त्यांची ही रक्कम चोरी ना व्हावी. पैशासाठी त्यांना कुणी मारुन टाकेल, अशी भीती त्यांना आहे. त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. एवढेच नाही तर त्यांना दिल्ली येथे जाण्यासाठी विमानप्रवास करावा लागेल, असे सांगितल्यावर ती म्हणाली, मी विमानात कशी बसू, ते पडले तर..?

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील कोटाभरी गावात राहणाऱ्या कुवरबाई यादवने आपली बकरी विकून घरासमोर शौचालयाचे बांधकाम केले होते. त्यांचा हा आदर्श पाहून गावातील सर्व लोकांनी घरासमोर किंवा घरात शौचालयाचे बांधकाम केले. याची दखल घेत सरकारने कुवंरबाईचा १७ सप्टेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान करण्यात येणार आहे. कुंवरबाईसोबत मुलगी सुशीला, नातू बुधराम, सरपंच वत्सला आणि जोहन यादव हेही दिल्लीत येत आहेत. हे ऐकून कुंवरबाईच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि म्हणाली ‘ मला स्वप्नातही वाटले नव्हते की मी विमानात बसून दिल्लीत जाईल. मोदी माझा मुलगा आहे. त्यांनी मला आई मानले आहे. त्यामुळे माझी मुलगी सुशीला त्यांची बहीण झाली. ती दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना राखी बांधेल. सुशीलाने खास आपल्या हाताने राखी तयार केली आहे.
कुंवरबाईची मुलगी सुशीला म्हणाली, जेव्हा डोंगरगढमध्ये पंतप्रधान आले होते. तेव्हा आईच्या पुढे ते नतमस्तक झाले होते. तेव्हापासून आई गावातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाली.
बातम्या आणखी आहेत...