आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ पुत्तिंगल मंदिरात आतषबाजीदरम्यान आग, १०६ ठार, ४०० जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलम - केरळच्या कोलम जिल्ह्यात शंभर वर्षे जुन्या पुत्तिंगल देवी मंदिरात रविवारी पहाटे आतषबाजी स्पर्धेदरम्यान फटाक्यांच्या गोदामाला आग लागली आणि पाहता पाहता १०६ लोकांचे प्राण गेले. ४०० हून अधिक जखमी आहेत.पंजक्षम्मा नामक एका ८० वर्षीय वृद्धेचे कुणी ऐकले असते तर ही दुर्घटना टळलीही असती. पंजक्षम्मांचे घर मंदिराजवळच आहे. एक दिवस भीषण अपघात होईल, असा इशारा देऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मंदिर प्रशासनापर्यंत सर्वांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.
त्यांची मुलगी अनिता प्रकाश म्हणाली, तक्रारींनंतर प्रशासनाने ही आतषबाजी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ती सुरूच राहिली. सत्यन यांनी सांगितले, ‘स्फोटांनंतर जागोजाग शरीरांचे तुकडे पडलेले होते. माझा पाय एकाच्या छातीवर पडला. पाहिले तर त्याचे छातीखालील शरीरच नव्हते. त्या मातेचे आपण खरेच ऐकले असते तर...’

आजवरचे सर्वात वेगवान, सुनियाेजित बचावकार्य
> पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समधील बर्न युनिटच्या ६ डॉक्टरांचे पथक घेऊन कोलमला पोहचले. कोणताही राजशिष्टाचार पाळू नका, असे आदेशही त्यांनी दिले होते.
> नौदलाने ३ जहाजे व डॉक्टरांचे पथक पाठवले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवता यावे म्हणून हवाई दलाने १० हेलिकॉप्टर पाठवले. एनडीआरएफची चार पथके चेन्नईहून आली.
> केरळमध्ये निवडणूक होत आहे. मात्र, भाजपसह सर्वच पक्षांनी प्रचारसभा रद्द केल्या आहेत.
पुढे वाचा... केरळमधील ३६ हजारांवर मंदिरांत वार्षिक २००० कोटींची आतषबाजी