आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Days Rescue Operation At Himachal Tunnel Lurches Towards End

9 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या 2 मजूरांना बाहेर काढले, तिसऱ्याचा शोध सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगद्यात अडकलेले दोन मजूर. यांच्यासोबत सीसीटीव्ही द्वारे संपर्क करण्यात आला. - Divya Marathi
बोगद्यात अडकलेले दोन मजूर. यांच्यासोबत सीसीटीव्ही द्वारे संपर्क करण्यात आला.
बिलासपूर/शिमला (हिमाचल प्रदेश) -हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जवळील टिहरा बोगद्यात 9 दिवसांपासून अडकलेल्या तीन मजूरांपैकी दोन जणांना सोमवारी दुपारी 4.30 वाजता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या टीमने ही बोगद्यापर्यंत ड्रिल करुन एक मीटर व्यासाचा पाइप टाकून त्यांना बाहेर काढले. तिसऱ्या मजूराचा शोध सुरु आहे.
बोगद्यात काम सुरु असताना दरड कोसळ्याने 12 सप्टेंबर रोजी तीन मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, फायर ब्रिगेड, स्थानिक प्रशासन आणि ज्यांच्याकडे रस्ते बांधणीचे कंत्राट होते त्या कंपनीचे कामगार, मेडीकल स्टाफ बचाव कार्य करत आहे. ड्रिल करण्यासाठी जयपूरहून मशिनरीज मागवण्यात आल्या होत्या.
सीसीटीव्ही कॅमेराद्वारे मजुरांशी संपर्क, पाइपने पोहोचवले अन्न
तीन मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. बचाव पथक सतीश तोमर आणि मनीराम या दोघांशीच संपर्क करु शकले. तिसरा ह्रदयराम अजून बेपत्ता आहे. सतीश आणि मनीराम यांच्यासोबत संपर्क करण्यासाठी बचाव पथकाने सीसीटीव्ही कॅमेरा आणि मायक्रोफोन आत सोडला होता. त्यामाध्यमातून दोघांसोबत बोलणे झाले. सुरुवातीचे तीन दिवस ते उपाशी होते. मात्र नंतर 4 इंचाच्या एका पाइपद्वारे त्यांच्यापर्यंत ग्लुकोज आणि ड्रायफ्रूट पोहोचवण्यात आले. ज्या ठिकाणी मजूर अडकले होते तिथे निबिड अंधार होता. बचाव पथकाचे प्रयत्न आणि त्यांची दुर्दम्य इच्छा शक्ती या बळावरच ते सुरक्षित बाहेर आले, असे आता बोलले जात आहे.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नव्हते सोपे
>> शनिवारीच मजुरांची सूटका होण्याची शक्यता होती, मात्र, जयपूरहून बोलावण्यात आलेल्या ड्रिल मशिनचा हायड्रो पाइप फुटल्याने काम थांबले होते.
>> रविवारी पाइप दुरुस्त करण्यात आला तर दुसऱा एक पार्ट नादुरुस्त झाला. त्यामुळे रविवारी रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले.
>> जोरदार पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. बोगद्यातही कित्येक फूट पाणी साचले होते, ते मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले.
>> बोगद्यात 40 मीटर पर्यंत मलबा साचला आहे. तो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आणखी बोगद्यात पडत आहे.
>> मशिनरीज डोंगरावर नेण्यात अनेक अडचणी आल्या. डोंगरावर तीन दिवसांमध्ये 500 मीटर रस्ता तयार करण्यात आला.
काय झाले होते
हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे चौपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. या मार्गावरील टिहरा येथील डोंगरातून बोगदा तयार केला जात आहे. हा बोगदा 1260 मीटर लांब असणार आहे. मागील शनिवारी बोगद्याचा एक भाग अचानक ढासळला. त्यात तीन मजूर अडकले. जेव्हा ही घटना झाली तेव्हा शिफ्ट चेंज होत होती, त्यामुळे बहुतेक मजूर बाहेर होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे सुरु आहे रेस्क्यू ऑपरेशन