Home »National »Other State» 11 Dead After A Bus Carrying Amarnath Yatra Pilgrims Fell Off The Road

जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळली; 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 15:26 PM IST

  • अपघातग्रस्तांची मदत करताना लष्कराचे जवान आणि स्थानिक नागरिक.
श्रीनगर- काश्मीरच्या बनिहालमध्ये रविवारी अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस 100 फूट दरीत कोसळली. यात 16 यात्रेकरू ठार तर 35 जखमी झाले. बस जम्मूहून पहलगामला जाताना बनिहालच्या रामबननजीक ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बिहारचे चौघे आहेत.

बसचे मागील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. बहुतांश यात्रेकरूंचा मृत्यू खडकावर आपटल्यामुळे झाला. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदतकार्य सुरु केले आहे. यानंतर जवानही दाखल झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बनिहालजवळ रामबन येथे हा अपघात झाला आहे. ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम येथे घेऊन जात होती. जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची ही बस ( JK02 Y0594) आहे.
कसा घडला अपघात
- ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यावर बस काही फूट खोल दरीत कोसळली. तिथे एक पावसाळी नाला आहे. यात्रेकरुंचा मृत्यू हा दरीत असणारे मोठ-मोठे दगड लागल्याने झाला आहे. रामबनचे एसएसपी मोहन लाल यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान घटनास्थळी राज्यपाल एन.एन. व्होरा रवाना झाले आहेत.

पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या बस अपघातील मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

हेल्पलाइन नंबर...
- बस दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 0191-2560401 & 0191-2542000

Next Article

Recommended