आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-जोधपूर बसला ट्रकची धडक, 12 ठार; राजस्थानमधील सिरोही येथे झाला अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ट्रकने दिली बसला धडक. शेजारी उलटलेली बस. - Divya Marathi
या ट्रकने दिली बसला धडक. शेजारी उलटलेली बस.
सिरोही (राजस्थान) - राजस्थानमधील सिरोही येथे नॅशनल हायवेवर गुरुवारी सकाळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली. बस शेजारी काही प्रवासी उभे होते त्यांच्यावर बस पडली. या अपघातात 12 जण ठार झाले असून अनेक जखमी आहेत.

काय आहे प्रकरण
- बस पुण्यावरुन जोधपूरला निघाली होती. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे बसचा थांबा होता. प्रवासी नाश्त्यासाठी खाली उतरले होते.
- त्याच वेळी पुण्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
- ही धडक एवढी जोरदार होती की बस उलटली आणि शेजारी उभ्या असलेल्या प्रवाशांवर पडली.
- नऊजण जागेवरच ठार झाले, अनेक लोक जखमी झाले.
- चार जखमींचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात आहे.

जखमींची नावे अशी
उथमण येथील सरवन हंसाजी मेघवाल, मथानिया जोधपूर येथील धर्माराम खीयाराम जाट, गुडा एंदला पाली येथील रहिवासी भावेश भीमाराम देवासी, बाहमण मंडली बाड़मेर येथील रहिवासी नेमीचंद बूदाराम, डिगाई पाली येथील रहिवासी आस्थाराम पाबूजी मीणा हे जखमी झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले जखमी...
बातम्या आणखी आहेत...