आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Pistols, 22 Magazines Recovered From Samjhota Xpress

पाकिस्तानातून आलेल्या रेल्वेतून 11 पिस्तूलांसह बनावट नोटा जप्त, आरोपी मुझफ्फरनगरचे रहिवासी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटारी / अमृतसर - समझौता एक्स्प्रेसमधून अवैध शस्त्र, बनावट नोटा आणि अंमली पदार्थांची तस्करी करणा-या सहा जणांना अटारी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. समझौता एक्स्प्रेसचा पाकिस्तानातून शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी सर्रास वापर होत असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. गुरुवारी समझौता एक्स्प्रेसमधून अटारी रेल्वे स्टेशनवर सहा प्रवाशांकडून 11 पिस्तूल आणि 22 काडतूस जप्त करण्यात आले. हे सर्वजण उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी आहेत.
स्कॅनिंग मशिनच्या तपासात कस्टम अधिका-यांना शंका आल्याने त्यांनी प्रवाशांची चौकशी केली. यात पिस्तूल आणि काडतूसे समोर आल्याने अधिका-यांना धक्का बसला. पाकिस्तानातून अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थ आणणारे आरोपी मुझफ्फरनगर येथील रहिवाशी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांची नावे शहनाज बेगम, राबिया, अनीश अहमद, रईज, आरिफ आणि नासिब असल्याचे सांगण्यात आले आहे. या सहा जणांची कसून चौकशी सुरु आहे.