आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात साक्षीदार उलटूनही मुलीने वडिलांच्या खुन्यास घडवली शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानातील जयपूर येथे एका खुन्यास वाचवण्यासाठी सात साक्षीदारांनी न्यायालयात आपले जबाब बदलले. दोषींना सजा मिळवून देण्याची जबाबदारी ज्या सरकारी वकिलाची होती त्यानेही आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली नाही. मात्र ११ वर्षांच्या मुलीने त्या खुन्यास न्यायालयात ओळखले. मुक्या असलेल्या पत्नीने खाणाखुणा करून न्यायालयात जबाब दिला. त्याआधारे मुलीची साक्ष ग्राह्य धरून त्या मारेकऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.  
 
जयपूर येथील जोहरी बाजारात अजय घोष याने चौकडी घाटावर अशोक पाल याचे दोन्ही हात कापले होते. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. सरकारी वकील महावीरसिंग यांनी सांगितले, अशोक मुलीला शिकवणी वर्गास सोडण्यासाठी जात होता. दरम्यान, अजय व अशोकमध्ये ८ लाखांच्या व्यवहारावरून जुना वाद चालू होता. न्यायाधीश तिरुपतीकुमार यांनी अजय यास आजीवन कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.   
 
सुनावणीच्या वेळी हवालदार हरिसिंग, केका गणेश, शोभा राजावत, जयंत पाल, महेश शर्मा आणि सुब्रतो यांनी खोटी साक्ष दिली होती. तत्कालीन सहायक सरकारी वकिलाने जवाब बदलणारी साक्षीदार केका  या शिक्षिकेस फितूर घोषित करून  तिची उलटतपासणी घेतली नाही. तसेच विधी विभागातील सहायक सरकारी वकिलाने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले नाही. यामुळे त्याच्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.  अखेर या मुलीने  तीन वर्षे झगडून वडिलांच्या आत्म्यास न्याय मिळवून दिला. 

मुक्या पत्नीचा न्यायालयात दुजोरा 
मामुनी पाल हिची शिक्षिका केका खटल्याची दुसरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. न्यायालयात तिने जवाब फिरवला. मामुनी पाल हिने घरी गेल्यावर आई करुणास सर्व घटना सांगितली. दरम्यान, तिची आई करुणा हिची साक्ष झाली. तिच्या आईला केवळ बंगाली भाषा समजते. बंगाली बोलताना हलणारे ओठ आणि त्याचे हावभाव तिला समजत असत. तसेच ती काय सांगते आहे याचे भाषांतर तिचे काका बंगालीत सांगू शकत होते. यासाठी दुभाषक म्हणून राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापक जोया चक्रवर्ती यांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या साहाय्याने साक्ष घेतली आणि बचाव पक्षाने उलटतपासणी घेतली.

आठ वर्षे वयाच्या मुलीसमोर खून 
मृत अशोक पाल मामुनी पाल यास शिकवणी घेणारे शिक्षक केका याच्या घरी सोडण्यास जात होते. त्या वेळी मामुनी पाल ८ वर्षांची होती. ती घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. न्यायालयाने तिच्या खरेपणाची कसोटी तपासून तिची वयाच्या ११ व्या वर्षी साक्ष नोंदवली. या वेळी मामुनी पाल हिने सांगितले, वडिलांचा  मित्र अजय घोष आमचा पाठलाग करत होता. घोष याने वडिलांच्या डोळ्यावर छत्रीने मारले तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी एका घरात शिरले. तेव्हा तेथून बाहेर काढून धारदार शस्त्राने हात छाटले. ज्या अंकलनी तिच्या वडिलांचे हात छाटले तो न्यायालयात उपस्थित आहे काय? तेव्हा मामुनी पालने आरोपीनेच माझ्या वडिलांना मारले होते, असे सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...