आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 11 Years Molestation From Brother In Law Then He Marry With Victim In Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टर दिराने आधी 11 वर्षे केला बलात्कार, मग पोलिस स्टेशनमध्ये घातला फुलांचा हार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर - मनियां परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने प्रायव्हेट डॉक्टरवर 11 वर्षे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सकाळी तोच डॉक्टर मिठाई आणि फुलांचा हार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पीडितेला प्रपोज केला. डॉक्टर म्हणाला, मी तिच्या प्रेम केले, पण तिने धोका दिला. मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण जराशा गोष्टीवरून ती नाराज झाली, आणि तिने थेट पोलिस स्टेशन गाठले.

- प्रायव्हेट डॉक्टर पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर तरुणीच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी आपसात प्रकरण मिटवण्याचे ठरवले. यानंतर दोन्ही पक्षांसमोर पोलिस स्टेशनच्या बाहेरच डॉक्टर आणि तरुणीने एकमेकांना वरमाला घातली.
 

पोलिसांना मिठाई देऊन नातेवाईक म्हणाले- आम्हाला कोणतीही कारवाई नकोय
- पोलिस स्टेशनबाहेर दोन्ही नातेवाइकांनी परस्पर प्रकरण मिटवण्याचे ठरवून पोलिसांना मिठाई दिली. म्हणाले की, डॉक्टर आणि तरुणी लग्नासाठी राजी आहेत. यामुळे आता कोणतीही कारवाई आम्हाला नकोय.
- समाजसेवक रामजी लाल म्हणाले की, दोन्ही पक्षांना बसवून वर आणि वधूला मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न झाला आहे. डॉक्टर आणि तरुणीने शपथ घेतली आहे की, ते आता कधीही वाद घालणार नाहीत आणि भविष्यात असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.

पोलिसांसमोर डॉक्टर म्हणाला- मी तिच्यावर प्रेम करतो आणि यापुढेही धर्मपत्नी मानून तिला नेहमी साथ देईन.

 

काय म्हणतात पोलिस?

- पोलिस स्टेशनचे एसएचओ राजाराम गुर्जर म्हणाले की, एका तरुणीने तक्रारअर्जाच्या माध्यमातून एका प्रायव्हेट डॉक्टरवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता.
- शुक्रवारी सकाळी दोन्ही पक्ष आले आणि त्यांनी समझौता केला. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. जे काही समोर येईल ते कोर्टापुढे सादर करू.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...