आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी दारुने घातली अंघोळ, त्यानंतर 1100 बकऱ्यांच्या गळ्यावर चालवली सुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा प्रकारे लाकडाच्या ओंडक्यावर बकऱ्याचे डोके ठेवले जाते. त्यानंतर बळी दिला जातो. - Divya Marathi
अशा प्रकारे लाकडाच्या ओंडक्यावर बकऱ्याचे डोके ठेवले जाते. त्यानंतर बळी दिला जातो.
झाशी (उत्तर प्रदेश)- विजयादशमीच्या दिवशी मां कालीसमोर बकऱ्यांची बळी देण्याची प्रथा या शहरात आहे. या निमित्त मां कालीच्या मुर्तीसमोर बकऱ्यांना दारुने अंघोळ घालण्यात आली. असे केल्याने देवी मां खुष होते, असे येथील पुजाऱ्याने सांगितले. त्यानंतर एक एक करुन तब्बल 1100 बकऱ्यांचा बळी देवीला देण्यात आला. हे बघण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते.
वाचा काय आहे परंपरा
- झाशी शहरातील खटकयाना परिसरात मां कालीच्या मुर्तीची स्थापना केली जाते.
- यावर्षी नवरात्रीची नवमी मंगळवारी होती. त्यामुळे त्याऐवजी विजयादशमीला बकऱ्यांचा बळी देण्यात आला.
- मां कालीच्या मुर्तीसमोर बकऱ्यांचा बळी देण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते.
- बळीची पद्धतही जरा वेगळी आहे. एका वारमध्ये बकऱ्याचे मुंडके वेगळे करण्याची रीत येथे आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या बकऱ्याला बळीसाठी ठेवले जाते.
काय सांगतात स्थानिक
- बळी देण्यापूर्वी बकऱ्याला दारुने अंघोळ घातली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ब्रांडची दारु आणली जाते.
- दारुने अंघोळ केल्यावर जर एखादा बरका थरथर कापू लागला तर लगेच बळी दिली जाते.
- बकऱ्यांचा बळी दिल्याशिवाय मां कालीची मुर्ती विसर्जित केली जात नाही. असे केल्याने मुर्तीचे वजन कमी होते असेही म्हटले जाते.
- अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. अशा प्रकारे बळी दिल्याने मनोकामना पूर्ण होतात असा स्थानिकांचा विश्वास आहे.
पुढील स्लाईडवर बघा, कशी दिली जाते बकऱ्यांचा बळी.... त्यासाठी स्थानिक असे धारदार शस्त्र घेऊन येतात...
बातम्या आणखी आहेत...