आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 112 Indians Arriving From Ebola Hit Liberia Today

दिल्ली एअरपोर्टवर इबोलाच्या तीन संशयीतांची टेस्ट, 112 भारतीयांचीही होणार तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनल)

मुंबई - इबोलाने थैमान घातलेल्या लायबेरिया आणि आसपासच्या देशातून 112 भारतीय नागरिक आज मायदेशी परतत आहेत. हे नागरिक मंगळवारी विमानतळावर पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान दिल्लीच्या विमानतळावरून इबोलाच्या तीन संशयीतांना तपासणीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मायदेशी परतणा-या भारतीय नागरिकांमध्ये काही प्रवासी साऊथ आफ्रिकन एअरवेजच्या फ्लाइटने मध्यरात्रीनंतर मुंबईला पोहोचणार आहेत. त्यापैकी काही प्रवासी आधी दिल्लीला जातील. त्याठिकाणी तपासणीनंतर त्यांना मुंबईला पाठवले जाईल. दरम्यान मंगळवारी सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कतारची राजधानी दोहा आणि अदीस अबाबाहून दोन विमाने दिल्लीला पोहोचली आहेत.

उपाययोजना
दिल्ली विमानतळ - इबोलाने आपल्या वेढ्यात घेतलेल्या देशातून परतणा-यांसाठी दिल्ली विमानतळावर चार इमिग्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत. या काऊंटरवर थर्मल स्कॅनर लावण्यात येत आहेत. त्याच्या मदतीने शरीराचे तापमान किती आहे, याची नोंद घेतली जात आहे. एखाद्या प्रवाशामध्ये काही लक्षणे अशल्याचा संशय आल्यास त्याला थेट राम मनोहर लोहिया रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत आहे.

मुंबई - मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान छत्रपत्री शिवाजी अंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर (CSIA) पोहोचताच ते रिकाम्या रनवेवर नेले जाईल. त्याठिकाणीच प्रवाशांना उतरवले जाईल व प्रवासांची तपासणी केली जाईल.

ज्या प्रवाशांमध्ये इबोला व्हायरस (EVD) ची लक्षणे आढळणार नाहीत त्यांना इमिग्रेशन आणि कस्टम क्लिअरंससाठी टर्मिनलकडे पाठवले जाईल, असे MIAL च्या अधिका-यांनी सांगितले. तर लायबेरियाहून येणा-या प्रवाशांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णवाहिकेतून थेट विशेष रुग्णालयात पाठवले जाईल.

3 देशांत तपासणी
या प्रवाशांची किमान तीन देशांमध्ये तपासणी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. लायबेरिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा त्यात समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडे उड्डाण करण्यापूर्वीच एखाद्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्याला त्याचठिकाणी थांबवण्यात आलेले असू शकते.