आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Children, Driver Killed As School Bus Collides With Train In Telangana

तेलंगणा: धडक झाल्यावर 200 फूट फरफटत गेली स्कूल बस, घेतला 25 चिमुकल्यांचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अपघातानंतर बसची अशी अवस्था झाली होती.)
मेडक / तेलंगणा - तेलंगणामधील मेडक जिल्ह्यात शाळेची बस आणि रेल्वेच्या अपघातात 25 विद्यार्थ्यांसह चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेड-हैदराबाद पॅसेंजर या रेल्वेबरोबर हा बसचा अपघात झाला. चालक रेल्वेक्रॉसिंगवरून बस नेण्याचा प्रयत्न करत असताना वेगाने येणा-या रेल्वेने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात सुमारे 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

हैदराबादपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असणा-या काकटिया शाळेतील विद्यार्थ्यांना ही बस घेऊन जात होती. मसिपगेटजवळील रेल्वे क्रॉसिंगवर या बसला रेल्वेने धडक दिली. या रेल्वे क्रॉसिंगवर फाटक नसल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. दरम्यान अपघात गंभीर असल्याने यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चालकाला रेल्वे येत असल्याचा इशारा देण्यात आला होता, तरीही त्याने त्याची पर्वा न करताच क्रॉसिंगवरून जाण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे अपघात घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सुत्रांना सांगितले. या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग आणि इतर साहित्य अपघात परिसरात अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. या अपघाताने स्थानिकांमध्ये संताप पसरला आहे. अनेक दिवसांपासून या क्रॉसिंगवर फाटक (गेट) बसवण्याची मागणी करण्यात येत होती. पण तरीही मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्वरित या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, ते घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याचे सुत्रांनी कळवले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा घटनास्थळाचे इतर फोटो...
घटनेनंतरचा घटनास्थळाचा व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाइडवर...
(सौजन्य- TV9)