आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Maoists Shot Dead In A Police Crpf Joint Operation In Jharkhand

झारखंड : पलामू जंगलात चकमक, जवानांचे 12 नक्षलींना कंठस्नान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/पलामू - झारखंडच्या पलामू जिल्ह्यात पोलिस आणि सीआरपीएफच्या जॉइंट ऑपरेशनमध्ये 12 नक्षलींचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही चकमक मंगळवारी पहाटे झाली. झारखंड पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लातेहार आणि पालमू जिल्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवल्याचे पोलिसांनी सांगितले. पलामूचे पोलिस अधिक्षक मयूर पटेल यांनी 12 नक्षली ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पलामू जिल्ह्याच्या सतबारा जंगलाच्या बाकोरिया परिसरात नक्षलवाद्यांचे शिबिर असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जॉइंट ऑपरेशनची योजना तयार करण्यात आली. त्यात पोलिसांनी सीआरपीएफची मदत घेतली.

मध्यरात्रीच सुरू केली होती कारवाई
पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गवर बाकोरियाजवळ रात्री 12 वाजताच पोलिसांनी घेराव घालण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर दोन्ही बाजुने गोळीबार सुरू झाला. पहाटेपर्यंत हा गोळीबार सुरू होता. त्यात बारा नक्षली ठार जाले असून आठ मृतदेह मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी होते.

शोधमोहीम सुरू
या कारवाईनंतर परिसरामध्ये पोलिस शोधमोहीम राबवत आहेत. पोलिस आणि सीआरपीएफच्या मते हे मोठे यश आले. या भागातील नक्षली कारवायांवर पोलिसांची नजर होती असा अंदाज लावला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कारवाईनंतरचे PHOTO