आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्‍तीसगडमधील रायगडमध्‍ये नरबळी, बारा वर्षीय मुलाचा केला शिरच्‍छेद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/रायगड - छत्‍तीसगडमधीलल रायगड जिल्‍ह्यामधील भगवानपूर परिसरात एका 12 ते 15 वर्ष वयोच्‍या मुलाचे शिर अणि धड काहीच अंतरावर आढळून आले. बाजूलाचा पूजेचे साहित्‍य आणि दारूच्‍या बॉटलही होत्‍या. त्‍यामुळे हा नरबळीच असल्‍याची चर्चा परिसरात होत असून, खळबळ उडाली आहे. हत्‍या झालेला मुलगा कोण आणि कुठला, याचा तपास पोलिस करत आहेत.
तीन ते चार लोकांनी दिला नरबळी ?
- एका मुलाचा कुणीतरी शिरच्‍छेद केल्‍याची माहिती पोलिसांना दिली.
- माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी आले. पोलिसांसोबत फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वाडची टीमसुद्धा होती.
- 100 मीटरच्‍या अंतरावर धड आणि शिर होते.
- हा नरबळ असून, तपास सुरू असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.
- परिसरातील कुणी लहान मुलगा गायब आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
- घटनास्‍थळावर असलेल्‍या दारूच्‍या बॉटल आधारे हे कृत्‍य तीन ते चार लोकांनी केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केले.
- या परिसरातील मागील पाच वर्षांतील हा तिसरा नरबळी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित photos

टीप - पुढील फोटो तुम्‍हाला विचलित करू शकतात...
(सर्व फोटो: लक्ष्मीधर पात्रा)
बातम्या आणखी आहेत...