आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य दिनाच्या परेडहून परतणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, संशयिताला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना सेेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स पार्कची आहे. - Divya Marathi
ही घटना सेेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स पार्कची आहे.
चंदिगड - येथे 12 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. स्वातंत्र्यदिनाचा शाळेतील कार्यक्रम आटोपून मुलगी परतताना ही घटना घडली. आरोपीने तिला बळजबरी पार्कमध्ये नेले आणि नीच कृत्य केले. 
 
संशयित नराधम ताब्यात
- चंदिगडचे एसएसपी ईश सहगल यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 8.15 वाजेची आहे. आरोपी 40 वर्षे वयाचा असून त्याने मुलीला धमकावून सेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स पार्कमध्ये नेले व बलात्कार केला.
- ते म्हणाले की, मुलीने सर्वात आधी घरच्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.
- सहगल म्हणाले की, पीडित मुलगी सरकारी शाळेतील आठव्या इयत्तेत शिकते. तिची सेक्टर 16 मधील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
- याप्रकरणी एका संशयिताला  ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
 
मागच्याच आठवड्यात IASच्या मुलीची झाली होती छेडछाड
- चंदिगडमध्ये मागच्याच आठवड्यात आयएएस ऑफिसर वीरेंद्र सिंह कुंडू यांची मुलगी वर्णिका कुंडूच्या छेडछाडीचे प्रकरण समोर आले होते. यातील आरोपी हरियाणाचे भाजप प्रमुख सुभाषा बराला यांचा मुलगा विकास बराला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...