आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांच्या Rape पीडितेला HC ने दिली अबॉर्शनची परवागनी, झारखंड सरकार करणार संपूर्ण खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंड हायकोर्टाने जमशेदपूरच्या 12 वर्षीय बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी दिली आहे. मुलगी 23 आठवड्यांची गर्भवती आहे. मंगळवारी रिम्सच्या डॉ. अनुभा विद्यार्थी यांच्या देखरेखीत मुलीचा गर्भपात होईल. रिम्सचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर रविवारी सायंकाळी 6 वाजता कोर्टाने सुनावणी केली आणि हा निर्णय दिला. 
 
गर्भपातानंतरचाही सर्व खर्च राज्य सरकार करणार 
- मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे झारखंड हायकोर्टाने रविवारी सायंकाळी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. रिम्सच्या डॉक्टरांनी दिलेला वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर जस्टिस रंगन मुखोपाध्याय यांनी गर्भपाताची परवानगी दिली.
- जमशेदपूरचे पोलिस आयुक्त म्हणाले, सोमवारी सकाळी मुलीला रिम्समध्ये अॅडमिट केले जाईल. 
- कोर्ट म्हणाले, मुलीला हॉस्पिटलमधून घरी आणि घरुन हॉस्पिटलमध्ये येण्या-जाण्याची सर्व जबाबदारी सरकारची राहील. त्यासोबतच गर्भपातानंतर जोपर्यंत तिच्यावर उपचार सुरु आहेत, तो सर्व खर्च राज्य सराकर करेल. 

ट्रॅव्हल एजन्सीच्या ड्रायव्हरवर आरोप 
- पीडित मुलीच्या आईने मुलीच्या अबॉर्शनची हायकोर्टाकडे परवानगी मागितली होती. 
- याचिकेत म्हटले होते, की मी आणि माझे पती कामावर गेल्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर असलेला उदय गगराई मुलीवर बलात्कार करायचा. त्याने मुलीला धमकी दिली होती, की याबद्दल कोणाला काही बोलली तर तुझ्या वडीलांचा खून करुन टाकेल. 

30 ऑगस्टला दाखल केली तक्रार 
- 12 वर्षीय मुलीवर बलात्काराची तक्रार 30 ऑगस्ट रोजी जमशेदपूरमधील सिदगोडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली त्यात मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. तेव्हा ती 22 आठवड्यांची गर्भवती होती. 
- आईच्या याचिकेवर शनिवारी हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने रिम्सच्या मेडिकल बोर्डाला अबॉर्शन होऊ शकते का, याची तपासणी करण्याचे आदेश दिले. रविवारी रिम्सचा अहवाल आल्यानंतर कोर्टाने तत्काळ सुनावणी करुन अबॉर्शनचे आदेश दिले. 
बातम्या आणखी आहेत...