आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांसाठी यांनी नेला होता प्रसाद, छाप्यात सापडले 100 कोटी रुपये आणि 127 किलो सोने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूचे सीएम ओ. पन्नीरसेल्वम गेल्यावर्षी तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर शेखर रेड्डी होते. (फाइल) - Divya Marathi
तामिळनाडूचे सीएम ओ. पन्नीरसेल्वम गेल्यावर्षी तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर शेखर रेड्डी होते. (फाइल)
चेन्नई - याठिकाणी बिझनेसमॅन शेखर रेड्डी यांच्या कार्यालयांवर आयटी डिपार्टमेंटने टाकलेल्या छाप्यात 106 कोटी रुपये रोख आणि 127 किलो सोने जप्त केले आहे. यात 10 कोटी रुपयांच्या नव्या नोटाही होत्या. जयललिता गेल्या महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्यावेळी शेखर त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन गेले होते.
दोन बिझनेसमॅनची चौकशी..
- इनकम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने गुरुवारी चेन्नई आणि वेल्लोरमधील आठ ठिकाण्यांवर छापे मारले.
- या प्रकरणात इनकम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटचे अधिकारी शेखर रेड्डी यांच्याशिवाय बिझनेसमॅन श्रीनिवास रेड्डी यांचीही चौकशी करत आहे.
- दोघेही वाळु व्यवसायाशी संबंधित आहेत. प्रेम नामच्या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. तेच या दोन्ही व्यावसायिकांलाठी फर्म्स चालवतात.
- शेखर यांचे तामिळनाडूच्या अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क असल्याचेही सांगितले जात आहे.
- गेल्या महिन्यात जयललिता जेव्हा अपोलो रुग्णालयात अॅडमिट होत्या त्यावेळी रेड्डी त्यांसाठी बालाजीचा प्रसाद घेून गेले होते.
पन्नीरसेल्वमशीही जवळचे संबंध...
- एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शेखर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचेही नीकटवर्तीय आहेत.
- गेल्यावर्षी पन्नीरसेल्वम तिरुपती मंदिरात गेले त्यावेळी शेखर सोबत होते.
- त्यावेळी काही फोटोही मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यात पन्नीरसेल्वमबरोबर शेखरही दिसत आहेत.
- शेखर तिरुमाला मंदिर ट्रस्टमध्येही सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांची सरकारच्या नेत्यांशी ओळखी आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नोटबंदीनंतरचे पाच मोठे छापे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...