आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: 12 वीपर्यंतच शिकू शकले, आता कर्मचाऱ्यांच्या 100 मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - स्वत:च्या उच्च शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न एक व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिकून पूर्ण करत आहे. रायपूरचे अचिन बॅनर्जी असे या व्यावसायिकाचे नाव. कुक्कुट पालनाचे ९ केंद्र ते चालवत असून त्यात ७०० कर्मचारी काम करत आहेत. मुलाने उच्च शिक्षण घ्यावे,अशी अचिन यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, अचिन यांनी कसेबसे १२ वीपर्यंतच शिक्षण घेतले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अचिन आता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत.

ते कंपनी कर्मचाऱ्यांच्या १०० हून अधिक मुलांचे नर्सरी ते उच्च शिक्षणापर्यंतचा संपूर्ण खर्च करत आहेत. सर्व मुले इंग्रजी व हिंदी माध्यमात शिकत आहेत. १५ मुलांचे पालक अचिन यांच्या कंपनीत काम करत नाहीत. शाळा- कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी दोन बसेसची व्यवस्थाही केली. या मुलांच्या शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त वह्या- पुस्तक आदींचा खर्च अचिन यांची कंपनी उचलत आहे. एवढेच नव्हे तर पोल्ट्री फॉर्ममध्येच मुलांच्या ट्युशनसाठी स्वतंत्र वर्ग तयार केला आहे. त्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्तीही केली. टयुशन दोन पाळ्यांत होते. कंपनीने  कर्मचाऱ्यांना घर व आरोग्य सुविधाही दिली आहे. पवनपूत्र हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष अग्रवाल म्हणाले, मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळते. महागाईत खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणे खडतर ठरते
याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे ते अचिन यांचे प्रयत्न व कष्ट वाया जाऊ देऊ इच्छित नाहीत. अचिन यांच्या कंपनीतील कर्मचारी एल. पटनायक यांची मुलगी अंजली अभियंता झाली आहे. अंजलीच्या शिक्षणाचा खर्चही कंपनीनेच केला.

आई-वडील रागवत, परंतु कसेबसे १२ वी उत्तीर्ण केले
शिक्षणामुळे आई-वडील मला नेहमी रागवत. त्यात मी कसाबसा बारावी झालो. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला,परंतु व्यवसायात रमल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. व्यवसायात यश मिळाल्यानंतर जास्त शिकलो नाही. यानंतर आई- वडिलांचे स्वप्न कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिकवून सत्यात उतरवत आहे. हिच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. यानंतर २००३-०४ पासून आतापर्यंत शैक्षणिक मदत सुरूच आहे. सर्व मुले एकाच ठिकाणी शिकावी यासाठी स्वत: शाळा चालवण्याचा विचार करत आहे.
- अचिन बॅनर्जी.
बातम्या आणखी आहेत...