आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 MLAs Revolt Against Lalu Prasad Yadav News In Marathi

लालुंचे बंडखोर 13 पैकी नऊ आमदार स्वगृही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातील ‘बंडोबा’ थंड पडत असल्याचे दिसत आहे. बंडखोर 13 पैकी नऊ आमदार पक्षात परतले आहेत. आणखी एक आमदार लालुंच्या तंबुत येण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये बसून डॅमेज कंट्रोल केल्यानंतर लालुंनी पाटण्यात येताच आगपाखड केली. ते म्हणाले, नितीश कुमार घाणेरडे स्कॅँडल मास्टर आहेत. अल्पसंख्येत आहेत. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर त्यांना वेड लागले आहे. प्रत्येक आमदारावर गळ टाकत आहेत. विविध प्रलोभने दाखवून फूट पाडत असल्याचे आम्ही ऐकले आहे.

लालु यांच्या पक्षाच्या 22 पैकी 13 आमदारांनी सोमवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. विधानसभेमध्ये त्यांना वेगळा गट म्हणून मान्यताही मिळाली होती. मात्र, रात्रीपर्यंत नऊ आमदारांनी बंडातून माघारी घेतली. लालु मंगळवारी पाटण्यात आल्यानंतर त्यांनी 18 आमदारांसोबत विधानसभा अध्यक्षांचे घर गाठले. त्यांनी वेगळ्या गटाला दिलेली मान्यता रद्द करण्याची विनंती त्यांच्याकडे केली. लालु म्हणाले, नितीश सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने करू देऊ.

लालु यांचा दावा : आणखी एक वाटेवर
नऊ आमदार पक्षात परतले असल्याचा दावा लालु यांनी केला आहे. आणखी एक आमदार राघवेंद्र येत आहेत, असा दावा लालुप्रसाद यांनी केला. आमच्याकडे न फिरकणार्‍या चौघांचा शोध घेतला जात आहे. ‘नॉट रिचेबल’ आमदारांमध्ये सम्राट चौधरी, जावेद इक्बाल अन्सारी, राघवेंद्र प्रताप सिंह आणि अख्तर अल इस्लाम यांचा समावेश आहे.

जदयुमध्ये स्वागत : लालुप्रसाद पक्ष फोडत आहेत, त्यामुळे ते दुसर्‍यांवर आरोप करत असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. त्यांच्यात मतभेद आहेत त्यामुळे त्यांच्यात फूट पडण्यायोग्य स्थिती आहे हे नाकारता येत नाही. राजद सोडून येणार्‍यांचे जदयूमध्ये स्वागत केले जाईल, असे नितीश कुमार म्हणाले.