आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम: पोलिसांच्‍या फायरिंगमुळे कोसळली हायव्‍होल्‍टेज तार, 13 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- आसाममध्‍ये सोमवारी विजेचा धक्‍का लागल्‍याने 13 जण ठार झाले आहेत. ही दुर्घटना येथील तिनसुकिया भागातील आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार पोलिसांच्‍या फायरिंगमुळे हायव्‍होल्टेज तार कोसळली व ही दुर्घटना घडली. पोलिसांच्‍या विरोधात येथे काही लोकांचे आंदोलन सुरू होते. दरम्‍यान पोलिसांना फायरिंग करावी लागली. आसामच्‍या पोलिस महासंचालकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्‍हणाले की, हवेत फायरिंग करताना तार तुटली व लोकांवर पडल्‍याने ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 20 लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांना का करावी लागली फायरिंग...
- ही घटना तिनसुकियाच्‍या पेंगेरी परिसरातील आहे.
- काही लोक येथे आंदोलन करण्‍यासाठी आले होते.
- काही वेळापूर्वी पोलिस आणि या लोकांमध्‍ये शाब्दिक चकमक झाली.
- त्‍यानंतर तणावावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली.
- एसपी एम. डी. महंता यांनी सांगितले - जखमींवर उपचार करण्‍यात येत आहेत.
- वरिष्‍ठ पोलिस अधिकारी म्‍हणाले - लोकांनी स्‍टेशनला घेराव घातला होता.
- लोकांजवळ हत्‍यारं आणि पेट्रोल बॉम्‍ब होते असाही आरोप आहे.
- आंदोलकांनी पोलिस ठाण्‍यावर दगडफेकही केली.
का विरोध करत होते लोक..
- या परिसरात काही दिवसांपूर्वी दोन हत्‍या झाल्‍या होत्‍या.
- आरोपिंना अटक करण्‍याच्‍या मागणीसाठी आंदोलक येथे जमले होते.