आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचे चर्चिल यांच्यावर अजूनही १३ रुपयांची उधारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - माजी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आता या जगात नाहीत; परंतु अजूनही त्यांच्यावर भारताचे कर्ज आहे. हे कर्ज ११६ वर्षे जुने आहे. त्यांना बंगळुरूतील एका क्लबचे १३ रुपये देणे लागतात. क्लबने फोटोसह १७ थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. त्यात चर्चिल यांचेही नाव आहे.
माजी पंतप्रधान त्यावेळी लष्करात अधिकारी होते. तेव्हा त्यांची भारतात नेमणूक होती. १८९६ मध्ये ते बंगळुरूत आले होते. तीन वर्षापर्यंत ते कँटमध्ये राहिले. जून १८९९ मध्ये नॉर्थ वेस्ट फ्रंटियर (सध्या पाकिस्तानचा भाग) येथील लढाईला गेले होते; परंतु त्यांनी क्लबची बाकी मात्र दिली नव्हती.
शहर खायला उठायचे
चर्चिल बंगळुरू शहरात राहायचे; परंतु ते क्लबमध्ये जास्त रमायचे. त्यांनी आपले पुस्तक ‘द अर्ली लाइफ ’ मध्ये बंगळुरूविषयी खूप काही लिहून ठेवले आहे. बंगळुरू शहरात त्यांचे मन रमत नसे. त्यांना हे शहर जणू खायला उठत असे. हे शहर अतिशय ऊब आणणारे असल्याचे चर्चिलने म्हटले आहे. शहरात असताना त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ वाचन आणि फुलपाखरांना एकत्र करण्यात घालवला. हे शहर तिसऱ्या प्रकारातील आहे. येथे मी केवळ दैनंदिन कामे केली. येथे ना सोसायटी आहे, ना धड खेळायची व्यवस्था, अशा शब्दांत चर्चिलने शहरावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नेहमीच येत होते क्लबमध्ये

चर्चिल क्लबमध्ये मद्यपानासाठी येत होते, असे दिसून येते. ते व्हिस्कीचे शौकीन होते. त्या काळी व्हिस्कीचा मोठा पेग पन्नास पैशांना होता आणि छोटा पेग २५ पैशांना होता. एकूण मिळूण त्यांच्यावर १३ रुपये थकबाकी निघाली आहे.

बंगळुरू त्यावेळी होते शांत

बंगळुरू क्लब त्याकाळी भारतातील सर्वात एलिट क्लब मानला जात. ते १९ व्या आणि २० व्या शतकातील सौंदर्याने ओतप्रोत दिसते. दुर्दैवाने या क्लबकडे चर्चिल यांचे ऐतिहासिक दस्तऐवज आढळून येत नाहीत.
क्लबचे अधिकारी कर्नल मूर्ती म्हणतात, आमच्याकडे केवळ जुन्या खातेवह्या आहेत. त्याशिवाय त्या काळातील क्लब मीटिंगच्या मिनिट्सचा तपशील उपलब्ध आहे. बंगळुरू शहरात त्यावेळी आजच्याप्रमाणे गर्दी पाहायला मिळत नव्हती. शहर अगदी शांत होते. केवळ लष्कराचे कँटोन्मेंट होते. त्यामुळे सैनिकांची गर्दी पाहायला मिळायची.