आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Years Old Girl Sucide At Gulab Sagarm In Jodhpur, News In Marathi

अल्पवयीन प्रेयसीने गुलाब सागरात उडी घेऊन संपवला जीवनप्रवास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- शहरातील गुलाब सागरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रातानाडा केसर बाग परिसरात राहणारे अल्पवयीन प्रेमी युगुल आत्महत्या करण्याच्या इराद्याने गुलाब सागरावर पोहोचले होते. परंतु तरुणीने सागरात उडी घेऊन आत्महत्या केली. परंतु तरुणाची हिम्मत झाली. तरुणीचे वय 13 वर्षे आणि तरुणाचे वय 15 वर्षे आहे. अल्पवयात दोघे एकमेकांच्या प्रेमात अडकले होते. परंतु, दोघांचे कुटुंबीय आपल्या प्रेमाचा स्वीकर करणार नसल्याच्या भावनेतून दोघांनीसोबतच जीवनप्रवास संपवण्याचा निर्णय घेतला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुल शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गुलाब सागरावर पोहोचले. तरुणीने ब्लेडने स्वत:च्या हाताच्या नसा कापल्या आणि सागरात उडी घेतली. मात्र, नंतर तरुणाची उडी घेण्याची हिंमत झाली नाही आणि तो काठावर तसाच उभा राहिला. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. त्याने फोन करून आपल्या दोन मित्रांना घटनास्थळी बोलावले. संपूर्ण माहिती सांगितले. दोघांनी तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती दिले. सगळेजण घटनास्थळी पोहोचले. तरुण तिथेच उभा होता. काही क्षणात पोलिसही पोहोचले.

तरुणीचा मृतदेहाचा शोध सुरु झाला. परंतु अंधार असल्याने अनेक अडचणी आल्या. मात्र गोताखोरांनी रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत तरुणी नववी इयत्तेची विद्यार्थिनी होती.
तरुणीने तलावात उडी घेण्या आधी ब्लेडने हाताच्या नसा कापल्या होत्या. भडभड वाहणारे रक्त पाहून तरुणाने आपला शर्ट आणि बनियन तरुणीच्या हाताला बांधले होते. दोघांनी सोबतच जीवनप्रवास संपवण्याचा निर्णय घेतला होता. तरुणीने सागरात उडी घेताना पाहून तरुण डगमगला. तलावात उडी घेण्याची त्याची हिम्मत झाली नसल्याचे त्याने पोलिसांना जबाब नोंदविताना सांगितले.