आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

68 दिवसांच्या उपवासानंतर 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, संत म्हणाले होते- आर्थिक लाभ होईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - १३ वर्षीय आराधनाने आता या जगाचा निरोप घेतला आहे. एका जैन मुनीच्या सल्ल्यानुसार तिने सलग ६८ दिवस अन्न-पाण्याविना राहिल्यानंतर प्राण त्यागले. स्वयंसेवी संस्था, बलाला हक्कुला संघमने मुलीला बळजबरीने उपवास करायला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. हैदराबाद पोलिस या तक्रारीची चौकशी करत आहेत.

आराधनाचे वडील लक्ष्मीचंद समधारी यांचे सिकंदराबादच्या पोट बाजार परिसरात सराफा दुकान आहे. व्यवसाय ठीकठाक नव्हता. त्यामुळे कुटुंबाने एका जैन मुनीचा सल्ला घेण्याचे ठरवले. त्यावर मुनींनी लक्ष्मीचंद यांना सांगितले की, चातुर्मासात मुलीने उपवास केल्यास व्यवसाय खूप चालेल. परिणामी वडिलांसाठी मुलीला अन्न-पाणी सोडणे भाग पडले. ६८ दिवसांत ती खूप क्षीण झाली. ऑक्टोबर रोजी व्रत पूर्ण झाले, मात्र सत्तरव्या दिवशी म्हणजे ऑक्टोबर रोजी आराधनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

आराधनाच्या अंत्यसंस्कारास सहभागी झालेल्या जवळपास ६०० नागरिकांनी तिला बाल तपस्वी ठरवून टाकले. आराधना सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होती. असे असताना तिला शाळा सोडून व्रत करण्यास का भाग पाडले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मुलीचे आजोबा मानेकचंद समधारी म्हणाले, आम्ही काहीच लपवले नाही. आराधना उपवास करते हे सर्वांनाच माहीत होते. लोक तिच्यासोबत सेल्फी काढत होते आणि त्यातीलच काही तिला उपवासाची परवानगी का दिली म्हणून प्रश्न विचारत आहेत.

पारायणातमंत्री पद्मराव प्रमुख पाहुणे, खासदाराचीही उपस्थिती ६८दिवसांचा उपवास संपल्यानंतर आराधनाची वृत्तपत्रात जाहिरात छापण्यात आली. त्यात सिकंदराबादमधील मंत्री पद्मराव गौड यांचा उल्लेख पारायण कार्यक्रमाचे प्रमुख असा होता. हा कार्यक्रम उपवास संपल्यानंतर आयोजित केला जातो. जहिराबादचे खासदार बी.बी. बाटील या कार्यक्रमात उपस्थित होते.

दोषींना अटक व्हावी
एका निरपराधमुलीची ही क्रूर हत्या आहे. दोषींना त्वरित अटक केली जावी. मुलांना अशा जीवघेण्या प्रकारात ढकलणे लाजिरवाणे. -अच्युता राव, अध्यक्ष, बलाला हक्कुला संघम

...मृत्यू नको असतो!
कोणत्याही वडिलास मुलीचा मृत्यू नको असतो. आराधनाने याअाधीही हे व्रत चांगल्या पद्धतीने केले होते. मात्र, या वेळी तिच्या शरीराचा प्रतिसाद भिन्न राहिला. -लक्ष्मीचंद समधारी, आराधनाचे वडील.
पुढील स्लाईडवर वाचा... काय म्हणाले आराधनाचे आजोबा... शाळेतही गेली होती आराधना....
बातम्या आणखी आहेत...