आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्‍ये 13 जिल्हा परिषदांवर तृणमूलचा झेंडा फडकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - हिंसाचार, गैरप्रकारांनी गाजलेल्या पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये निर्विवाद परिवर्तन घडवून आणले आहे.राज्यातील एकूण 17 पैकी 13 जिल्हा परिषदांवर तृणमूलचा झेंडा फडकला आहे. डावे पक्ष माकप आणि भाकपसह काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. सन 2011 च्या विधानसभेतील विजयानंतर पंचायत निवडणुकांमध्येही नेत्रदीपक यश मिळवून राज्यात परिवर्तनाचे वर्तुळ पूर्ण केले असल्याची प्रतिक्रिया तृणमूलने व्यक्त केली आहे.


संपूर्ण राज्यात डाव्यांना दोन आणि काँग्रेसला एक जिल्हा परिषद राखता आली आहे. डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांमध्ये तृणमूलने 12 पैकी 11 आणि उत्तर बंगालमध्ये पाचपैकी 2 जिल्हा परिषदा तृणमूलने जिंकल्या आहेत. शारदा चिटफंड घोटाळ्यासह गेल्या दोन-अडीच वर्षातील विविध वादग्रस्त प्रकरणे, तृणमूल काँग्रेसच्या धटिंगणशाहीचा मुद्दा वारंवार चर्चेत येऊनही बंगालच्या ग्रामीण भागातील मतदार ममतादीदींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.


सिंगूरमध्येही घवघवीत यश
टाटा प्रकल्पाला हुसकावून लावलेल्या सिंगूरच्या नागरिकांनी दीदींच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहे.
या ठिकाणच्या 16 पैकी 12 ग्रामंपचायती तृणमूलने जिंकल्या आहेत.