आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

138 कॉलेजेसना अखेरची घरघर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर/ अहमदाबाद/ रायपूर - तंत्रज्ञान महाविद्यालयांची दुरवस्था समोर आली आहे. देशातील अशी 138 महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे 250 कॉलेज बंद पडले आहेत. ही सर्व इंजिनिअरिंग, एमबीए व एमसीएची आहेत. गेल्या दशकभरात याच पदव्यांच्या बळावर अनेक विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपये पगाराच्या नोक-या मिळाल्या, पण आता या पदव्यांच्या चकाकीवर धूळ बसते आहे.


राजस्थानात मॅनेजमेंट कॉलेजमधील सुमारे 66 टक्के जागा, तर इंजिनियरिंग कॉलेजमधील 25 टक्के जागा रिक्त राहतात. चाकसू येथील स्वरूप कॉलेज आॅफ मॅनेजमेंट तर फक्त 2008 ते 2011 अशी तीन वर्षेच चालले. कॉलेजचे संचालक साकेत माथूर यांच्या मते सरकारने मंजूर केलेला नीरस अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेण्यात कमी पडतो. विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतले नाही, तर कॉलेज कसे चालणार? अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मानसिकता, सध्याची आवश्यकता याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे.


प्लेसमेंटमध्ये अपयशी कॉलेजेसकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
बंद होणारी महाविद्यालये
2010-12225बिझनेस स्कूल
52इंजिनिअरिंग कॉलेज
2013138 एमबीए, इंजिनिअरिंग व एमसीए
रिक्त जागा
45% अभियांत्रिकी
45% एमसीए
38% एमबीए
एमसीएत रस का नाही?
पदवी, मग 3 वर्षांचे एमसीए करण्याऐवजी विद्यार्थी पाच वर्षांत अभियांत्रिकी आणि दोन वर्षांत मास्टर कोर्स करणेच पसंत करत आहेत. एआयसीटीईने बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना एमसीए द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवले आहे.
असोचेमचा अहवाल
० अनेक खासजी बिझनेस स्कूल मॅनेजमेंट गुरूंसाठी गुंतवणुकीतून मिळणा-या उत्पन्नाचे केवळ एक साधन आहेत.
० अनेक बिझनेस स्कूल जाहिरातींच्या भरवशावर चालत आहेत. ते खोटा प्रचार करतात.
० एमबीएला इंडस्ट्रीजमध्ये यशाची गुरुकिल्ली मानण्यात येऊ नये.
पाच वर्षांत आले भरमसाट पीक
अभियांत्रिकी आणि मॅनेजमेंटच्या जागांमध्ये तिप्पट वाढ
चांगली नोकरी मिळण्याच्या आशेने विद्यार्थी एमबीए, एमसीए किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. जी महाविद्यालये त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, त्यांच्याकडे ते पाठ फिरवतात. - एस.एस. मांथा, अध्यक्ष, एआयसीटीई