श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अपघताता 14 जण ठार झाले. दलसर भागात प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत जाऊन कोसळला. यात पाच महिला आणि एका बालकासह 14 जणांचा मृत्यू झाला. 17 लोक जखमी आहेत. अपघाताची माहिती कळाल्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याआधी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एक मिनीबस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 15 जण ठार झाले होते.
फाइल फोटो