आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरी: रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन 2 ठार, 14 जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरी- उडिसामधील पुरी येथे भगवान जगन्‍नाथाच्‍या रथयात्रेत शनिवारी चेंगराचेंगरी झाली असून यामध्‍ये दोन भाविक ठार, तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना कटकच्‍या रूग्‍नालयात दाखल करण्‍यात आले आहे. मृतांमध्‍ये विजयलक्ष्मी मोहंती (वय 65) या महिलेचा समावेश आहे.
या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू भालभद्र आणि बहिण सुभद्रा यांचे तीन रथ असतात. भगवान जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या भक्तांना पहांडी असे म्हणतात. बाराव्या शतकापासूनची परंपरा असलेल्‍या या रथयात्रेला सकाळी मोठ्या थाटात सुरूवात झाली. लाखो भाविक रथ ओढत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंदिचा मंदिराच्‍या दिशेने निघाले असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे.
कुठे झाली चेंगराचेंगरी?
मुख्‍य मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्‍या गजपती किंग पॅलेसजवळ शनिवारी चेंगराचेंगरी झाली आहे. रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी एकट्या पुरीमध्ये तब्बल सात हजार पोलिसांची फौज तैनात आहे.
प्रशासनाने घेतली खबरदारी
यंदा खबरदारीचा उपाय म्‍हणून VIP व्‍यक्‍तिंच्‍या गाड्याही रथयात्रेजवळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मुख्‍य मार्गात अडथडा निर्माण होणार नाही यासाठी वाहनतळाची व्‍यवस्‍था केली आहे. साध्या वेषातील पोलिसांसह, बॉम्ब शोधक पथके, अॅब्म्युलन्स, फायर ब्रिगेडच्या गाड्याही येथे तैनात केल्या आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, रथयात्रेत लाखो भाविकांची गर्दी