आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड: चार लोकांसाठी केवळ 200 ग्रॅम तांदूळ, खेचर हाकणारेच करतात बलात्कार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/डेहराडून/गोचर- उत्तराखंडमध्य आलेल्या महाप्रलयाला आज 14 दिवस झाले आहे. तरी देखील नैसर्गिक प्रकोप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. खराब हवामानामुळे बद्रीनाथ येथे सुरु असलेल्या बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण झाली आहेत. आज (शनिवारी) या कामात 19 पेक्षा जास्त हेलिकॉप्‍टरची सेवा घेण्यात आली आहे. परंतु खराब हवामान असल्यामुळे हेलिकॉप्टरला उड्डाण घेताना अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत एक लाख पाच हजार 606 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

दुसरीकडे, देशाभरातून मोठ्याप्रमाणात मदत पाठवली जात असताना पूरग्रस्तांना ती देण्यात हलगर्जी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. चार सदस्य असलेल्या कुटूंबाला केवळ 200 ग्रॅम तांदूळ आणि 100 ग्रॅम डाळ दिली जात आहे. गुप्‍तकाशी आणि फाटा दरम्यान असलेल्या खुमेरा गावात हा प्रकार सुरु आहे.

उत्‍तराखंडात जवळपास 2000 टन धान्य पाठवण्यात आले आहे. परंतु मदत वाटपात हलगर्जीपणा केला जात असल्याने पीडित नाराज झाले आहेत. तसेच खेचर हाकणारे लोकच पूरग्रस्त महिलांवर बलात्कार करत असल्याचा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा आणि राज्याचे विकासमंत्री रक्षपाल सिंग यांनी केला आहे.

उत्तरकाशीमधील भागीरथी नदीला पूर आला आहे तर उफनती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. दरम्यान, गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टरच्या अपघातातील शहीद 20 जवानांना मानवंदना देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, की हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स येथे आणखी 15 दिवस थांबतील.