यावेळी मोदींनी आणखी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, 'भारतीय PIO (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन) कार्ड लवकरात लवकर OCI (ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडिया) कार्डमध्ये बदलून घ्या. भारत सरकारने हे कार्ड बदलण्याच्या प्रोसेसला जून पर्यंत विनादंड मुदतवाढ दिली आहे.'
पंतप्रधान म्हणाले, देशाच्याविकासात प्रवासी भारतीय आमचे भागिदार आहेत. मी विश्वासाने सांगू इच्छितो की 21वे शतक हे भारताचे असेल.
येथेही मोदींनी काळेधनचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, काळेधन आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत तुम्ही दिलेली साथ महत्त्वाची होती.
पंतप्रधान म्हणाले माझ्यासाठी FDI चा अर्थ फक्त थेट परदेशी गुंतवणूक नाही तर फर्स्ट डेव्हलप इंडिया देखिल आहे.
- पंतप्रधान म्हणाले, Know India कार्यक्रमांतर्गत विदेशात राहाणे यंग इंडियन्सचे ग्रुप्स भारतात येतील. पहिली बॅच बंगळुरुमध्ये या कार्यक्रमात सहभागी होईल. मी स्वतः त्यांचे स्वागत करतो.
- सर्व PIO कार्ट धारकांना मी आवाहन करतो की त्यांनी OCI मध्ये आपले कार्ड बदलून घ्यावे. मला माहित आहे आपला दिनक्रम व्यस्त असतो. अशा गोष्टी तुम्ही विसरु शकता. त्यामुळेच कोणत्याही दंडाशिवाय भारत सरकारने ते बदलण्याची मुदत जून पर्यंत वाढविली आहे.
पंतप्रधान म्हणाले, 'अनिवासी भारतीयांकडून दरवर्षी भारतात होणारी गुंतवणूक जवळपास 69 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. हे अमुल्य योगदान आहे.'
- आम्हाल ब्रेन-ड्रेनला ब्रेन-गेनमध्ये बदलायचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यासाठी तुमचा पासपोर्ट आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
भारतीय वंशाचे आहेत एंटोनिया कोस्टा
- पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनिया कोस्टा हे भारतीय वंशाचे आहेत. एंटोनिया यांचे अनेक नातेवाईक गोव्यातील मडगाव येथे राहातात.
- कोस्टा यांना त्यांचे कुटुंबिय प्रेमाने बाबुश म्हणतात. कोकणी भाषेत त्याचा अर्थ लाडका असा होतो.
- एंटोनिया कोस्टा यांचे वडील ओर्लांदो द कोस्टा प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी रविंद्रनाथ टागोरांवर एक लेख लिहिला होता.
- गोव्यावर जेव्हा पोर्तुगीजांचे शासन होते, तेव्हा ओर्लांदा तरुण होते आणि ते कित्येक वर्षे गोव्यात वास्तव्याला होते.