आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडात बस अपघातात १५ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- पिथौरागड येथून दिल्लीला जाणारी उत्तराखंड रोडवेजची बस शनिवारी अलमोडा जिल्ह्यात १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ जण ठार, तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले.

कुमाऊंचे पोलिस उपमहानिरीक्षक पुष्कर सैलाल यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी एक वाजता झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
बातम्या आणखी आहेत...