आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या गोपालगंजला गावठी दारूचे १५ बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपालगंज - बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विषारी दारू पिऊन १५ जणांनी प्राण गमावले आहेत. एका व्यक्तीला अंधत्व आले आहे. पाच पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात हा प्रकार घडला आहे.

गोपालगंज जिल्ह्यातील एकास दारू सेवनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे, अशी माहिती गोपालगंज जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी राहुलकुमार यांनी दिली. मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार ही दारू देशी आणि विषारी होती. आहे, तर काही मृतांच्या कुटुंबीयांनी हे कारण नाहीच, असे लिहून दिले आहे.मृतांच्या मृत्यूसाठी केवळ हे एकमात्र कारण नाही, असेही काहींनी सांगितले आहे.

मंझा, थवे, यादवपूर, सिद्धवालिया आणि कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे घडले आहेत. मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतर ७ मृतदेहांचा दफनविधीही झाला आहे. ५ जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून ३०० बाटल्या दारू जप्त करण्यात आली आहे. अजूनही विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ही कारवाई पुढेही सुरूच राहील.
बातम्या आणखी आहेत...