(फाईल फोटो: चाईबासा कारागृह)रांची- झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका धक्कादायक घटना घडली आहे. चाईबासा कारागृहातील 15 नक्सली कैदी मंगळवारी फरार झाले. कारागृहातील पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून एकूण 17 कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यु झाला. तीन कैदी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
चाईबासा कारागृहातील एकूण 54 कैद्यांना मंगळवारी कोर्टात नेण्यात आले होते. सुनावणी नंतर सगळ्याना पुन्हा कारागृहात आणले. गाडीतून उतरत असताना 18 कैद्यांनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून पळ काढला. कारागृहातील पोलिसांनी कैद्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात पाच कैद्यांचा मृत्यु झाला. मात्र, 13 कैद्यांना पळून जाण्यात यशस्वी झाले.कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार खुले राहिल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी...
चाईबासा कारागृहातून 13 कैदी फरार झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. कारागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त आहे. पोलिसांशिवाय कारागृहात कोणालाही जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य मार्गांवर पोलिस तैनात करण्यात आले आहे. अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. चाईबासाचे एसपी नरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, आणि कामात कसूर ठेवणार्या पोलिसांवर कारवाई केली जाईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वी चाईबासा कारागृहातून तीन कैदी फरार झाले होते....