आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत; गुप्तचर संस्थाचा सतर्कतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानच्याआंतरराष्ट्रीय सीमेतून १५ दहशतवादी देशात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी राजस्थान दहशतवादाविरोधी पथकाला (एटीएस) याबाबत अलर्ट िदला आहे. त्यानंतर एटीएसने जयपूर आणि जोधपूरच्या पोलिस आयुक्तांसह सर्व पोलिस अधीक्षकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.

एटीएसने २८ ऑगस्टला लिहिलेल्या पत्रात महत्त्वपूर्ण स्थळे आ संस्थांची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याची सूचना केली आहे. आयबी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. पाकिस्तानला लागून असलेल्या जैसलमेर, बाडमेर आणि श्रीगंगानगर येथून हे दहशतवादी घुसखोरी करू शकतात, त्यामुळे तेथे सावधगिरी बाळगावी, असे सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सांगण्यात आले आहे.

एटीएसचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक त्रिपाठी म्हणाले,“ दहशतवादी कुठून घुसखोरी करतील हे सध्या सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्यास सांगण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा फ्लॅग मीटिंग
जम्मू- सीमेवरीलतणाव कमी करण्यासाठी शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्या पुन्हा फ्लॅग मीटिंग झाली. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आरएस पुरा सेक्टरच्या सुचेतगढच्या सीमा चौकीवर दोन्ही देशांचे अधिकारी भेटले. संघर्ष विरामाचा सन्मान करण्याबाबत उभय पक्षांत एकमत झाले. सध्या कोणत्याही सेक्टरमध्ये गोळीबाराचे वृत्त नाही.