आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Student Death In Bus Accident, News In Marathi

बस दरीत कोसळल्याने आंध्र प्रदेशात १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात पेणूकोडा - मदाकसीरा मार्गावर एक बस दरीत कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत. पैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांमध्ये बहुतांशजण विद्यार्थी असून ते २० वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाची बस मद्राकसीराहून पेणूकोंडाकडे जात होती. त्या वेळी समोरून येणाऱ्या ऑटोला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. मृतांमध्ये इंजिनिअरिंगच्या वि‌द्यार्थ्यांचा समावेश असून ते कॉलेज संपवून गावी परतत होते.