आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Women\'s Have Died After Undergoing Sterilization Surgery At A Health Camp At Bilaspur.

छत्तीसगड: मृत महिलांची संख्या 15, प्रकरण गुंडाळण्यासाठी आरोग्य अधिकार्‍यांचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर मृत्यु झालेल्या चैतीबाईच्या चिमुरडी आणि चैतीबाईची आई)

बिलासपूर/रायपूर- छत्तीसगडमधील आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर मृत महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. मृत महिलांची संख्या 15 वर पोहोचली आहे. सात महिलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर अस्वस्थ झालेल्या महिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना आजाराचे निदान करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कानन पेंडारी येथील नेमीचंद रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. काही तासांत 83 महिलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर बहुतांश महिलांना त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारदरम्यान आतापर्यंत 15 महिलांचा मृत्यू झाला आहे.

मृतामध्ये बैगा जमातीच्या चैतीबाई हिचा समावेश आहे. या जमातीत महिलांना कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास बंदी आहे. बैगा जमाती संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

चैतीबाईचा मृत्यु बुधवारी झाला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत पोस्टमार्टम करून तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना देण्यात आला. चैतीबाई ही धनौली गावातील रहिवासी होती. मृत महिलांच्या मृत्युनंतर त्याचे पोस्‍टमॉर्टम आणि अन्य औपचारिकता पूर्ण करण्यातही आरोग्य विभाग घाई करताना दिसत आहे.

दुसरीकडे, चैतीबाईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. प्रशासनाने चैतीबाईच्या मृत्युनंतर दोन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. धनादेश घेण्यासही चैतीबाईच्या नातेबाईकांनी स्पष्ट नकार दिला आहे. संतप्त गावकर्‍यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मृत महिलांच्या नातेवाईना मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे. मृत महिलांच्या नातेवाईकांसह संतप्त गावकर्‍यांनी चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी प्रत्येक मृत महिलांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली असताना प्रत्यक्षात दोन-दोन लाखांचा धनादेश दिला जात आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ...
डॉ. रमणेश मूर्ती (एमएस, सिम्स) यांच्या मते, कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर काही तासांत महिलांना उलटी होऊन त्या अस्वस्थ का झाल्या, हे रक्ताचा अहवाल पहिल्यानंतरच कळेल. अस्वस्थ महिलांना अँटीबॉयोटिक औषधींचा डोस देऊन त्यांना आधी शुद्धीवर आणणे गरजेचे असल्याचे डॉ. मूर्ती यांनी म्हटले आहे.
डॉ. सुनीता मित्तल (पूर्व एचओडी, गायनेकोलॉजी, एम्स दिल्ली,) यांच्या मते, महिलांना उलट्या होत आहेत. म्हणजेच त्यांना औषधांचे साइड इफेक्ट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्जिकल कारणांमुळे महिलांचा इतक्या लवकर मृत्यु होणे अशक्य असल्याचे डॉ.सुनीता मित्तल यांनी म्हटले आहे.

'सिप्रोफ्लोक्सेसिन'वर बंदी
बिलासपूरमधील नेमीचंद रुग्णालयात आयोजित करण्यात आलेले कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान महिलांना देण्यात आलेली एंटीबायोटिक्समधील एक सिप्रोफ्लोक्सेसिनवर बंदी आहे. तसेच ही औषधी रायपूरमधील खम्हारडीह येथील एका फार्मास्युटिकल कंपनीची असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, घटनेची छायाचित्रे...