आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 Years Old Girl Allegedly Raped And Killed In WB After She Defied Kangaroo Court\'s Order To Lick Spit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किळसवाणे कृत्य करण्याचा पंचायतीचा आदेश न पाळल्याने मुलीची निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलपाईगुड़ी- किळसवाणे कृत्य करण्‍याचा गाव पंचायतीचा कथित आदेश न पाळल्याने एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.
जपाईगुड़ीमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्याकडून तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?
जलपाईगुड़ीमधील धूपगुड़ी या गावात 'सलिशी सभा' (पंचायत) बोलावली होती. शेत नांगरण्यासाठी भाड्याने घेतलेल्या मशिनीचे भाडे थकल्याने पंचायतीने पीडितेच्या वडिलांना फटके मारण्याचे फर्मान सोडले होते. आपल्या वडिलांना मारहाण होत असताना पाहून 15 वर्षीय पीडिता वडिलांचा बचावासाठी धावून आली होती. परंतु पंचायतीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने 15 वर्षीय पीडितेला किळसवाणे कृत्य करण्याची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, पीडितेने त्याला विरोध दर्शवला. या घटनेनंतर काही तासांतच पीडितेचा मृतदेह गावाजवळील रेल्वे रूळावर आढळून आला. त्यामुळे पंचायतीवर संशयाची सुई फिरताना दिसत आहे.

या घटनेमुळे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस अडचणीत सापडले आहे. पक्षाच्या महिला सल्लागार नमिता रॉंय यांनी पंचायतीचे नेतृत्त्व केले होते. पीडितेच्या कुटूंबियांनी नमिता रॉय आणि यांच्या पतीसह 13 लोकांविरोधात बलात्कार आणि हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आतापर्यत तीन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या?
गावातील गणेश प्रसाद या व्यक्तीला पीडितेचा मृतदेह सगळ्यात आधी आढळला. मंगळवार सकाळी सव्वा आठच्या सुमारास रेल्वे रुळावर अर्धनग्न मृतदेह आढळला. मुलीने आत्महत्या केल्याचे पंचायतीमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी म्हटले आहे. परंतु पीडितेचा मृतदेह पाहता आत्महत्या केल्यासारखे दिसत नाही.

पी‍डितेची हत्या करण्‍यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मुलीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्‍यात आली आहे. या दिशेने तपास सुरु आहे.
(फोटो: पीडितेचा मृतदेह रेल्वे रुळावरून बाजूला करताना गावातील लोक )