आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या गॅंगरेप पीडितेने दिला मुलीला जन्म, अभ्यासू मुलीचे आयुष्य असे झाले बर्बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरुक्षेत्र (हरियाणा)- गॅंगरेप पीडित 15 वर्षीय मुलीने सकाळी एका गोंडस बाळाला जन्म दिला. डिलिव्हरी नॉर्मल झाली पण मुलगी प्रिमॅच्युअर असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. स्पेशल न्युबॉर्न केअर युनिटमध्ये या चिमुकलीवर उपचार करण्यात येत आहेत. सात महिन्यांपूर्वी या पीडितेवर गॅंगरेप झाला होता. पण तिने आणि कुटुंबीयांनी याची तक्रार कुणाकडे केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी शाळेत ही पीडिता चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले होते.
असा झाला होता खुलासा
- पीडिता साडेसहा महिन्यांची गर्भवती होती तेव्हा ही बाब समोर आली होती.
- गर्भाला साडेसहा महिन्यांचा कालावधी झाला असल्याने गर्भपात करणे शक्य नव्हते.
- मुलीने गॅंगरेपची माहिती दिल्यानंतरही कुटुंबीयांनी याची तक्रार केली नव्हती. ही घटना उघडकीस येऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता.
- पण मुलगी गर्भवती आहे आणि तिचा गर्भपात करता येणार नाही याची माहिती मिळाल्यावर तिला नारी निकेतनमध्ये पाठविण्यात आले होते.
- याबाबत तिने काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली होती. पण यापूर्वीच तिची डिलिव्हरी झाली.
असे उद्धवस्त झाले अभ्यासू मुलीचे आयुष्य
- हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावरही पीडिता दररोज दोन तास अभ्यास करायची.
- तिला अभ्यास करायला आवडतो. शाळेत ती एक हुशार विद्यार्थीनी आहे.
- दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे आहे. त्यानंतर उच्चशिक्षण घ्यायचे आहे, असे पीडिता सांगते.
- तिला पोलिस विभागात नोकरी करायची आहे. येथेच तिला न्याय मिळू शकतो. तसेच इतर पीडितांना न्याय देता येईल असे ती सांगते.
अश्लिल व्हिडिओ क्लिप, अनेकदा गॅंगरेप
- पीडित तरुणीवर अत्याचार करताना आरोपींनी या घटनेची अश्लिल व्हिडिओ क्लिप तयार केली होती.
- तिच्यावर दोन नव्हे तर चार-पाच तरुणांनी बलात्कार केला होता, असे तिच्या चुलत भावाने सांगितले आहे.
- एवढेच नव्हे तर क्लिपची धमकी देऊन हे तरुण तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार करायचे.
पीडितेने ओळखले आरोपी
- पीडितेने दोन आरोपींना ओळखले आहे. ज्या ठिकाणी गॅंगरेप करण्यात आला त्याची माहितीही पोलिसांनी घेतली आहे.
- पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पीडितेच्या बाळाचे फोटो.... आईवडील म्हणाले- कोण करणार बाळाचा सांभाळ...
बातम्या आणखी आहेत...