आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15000 Strong Dharma Sena In Uttar Pradesh Readies For War With Islamic State

यूपी: ISIS च्‍या विरुद्ध हिंदू संघटनांनी बनवली 15,000 लोकांची धर्म सेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म सेनेचे कार्यकर्ते. - Divya Marathi
धर्म सेनेचे कार्यकर्ते.
मेरठ/ लखनौ - भारतात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी दोन हात करण्‍यासाठी हिंदू स्वाभिमान संघटनेने ‘धर्म सेना’ स्‍थापन केली आहे. या संघटेनेने म्‍हटले, 'आयएसआयएस 2020 पर्यंत संपूर्ण पश्चिम उत्‍तर प्रदेशाला आपल्‍या ताब्‍यात घेईल. असे होऊ नये, यासाठी आतापासूनच हे पाऊल उचलने गरजेचे आहे.
कशी होत आहे ‘धर्म सेने’ची बांधणी ....
- उत्‍तर प्रदेशातील सर्वात संवेदनशील समजल्‍या जाणाऱ्या पश्चिमी भागात ही संघटना सक्रिय आहे.
- धर्म सेनेच्‍या नेत्‍याने सांगितले, ''भारताच्‍या सरक्षणासाठी आणि आयएसआएसला टक्‍कर द्यायला आमच्‍याकडे अगोदरच 15 हजार लोक आहेत.''
- धर्म सेनेची बांधणी करण्‍यासाठी विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी आणि हिंदू स्वाभिमान संघटना एकत्र आल्‍यात.
- या सेनेमध्‍ये मुलांही सहभगी करून घेतले जात आहे. त्‍या पैकी काहींचे वय 10 वर्षांपेक्षाही कमी आहे.
- या सर्वांना तलवारबाजी, बंदूक चालवणे आणि इतर प्रशिक्षण दिले जात आहे.
गाजियाबादमध्‍ये आहे हेडक्वार्टर
- गाजियाबादमधील डासनामध्‍ये असलेले एक मंदिर या संघटनेचे मुख्‍यालय आहे. या संघटनेचे नेते याच ठिकाणी भेटतात.
- संघटनेच्‍या शिबिराला हजेरी लावणाऱ्यांची संख्‍या वाढत असल्‍याचे एका नेत्‍याने सांगितले. सध्‍या 50 शिबिरे सुरू असून, त्‍यातील काही गोपनीय आहेत.
- यामध्‍ये मुलं आणि मुलींना ट्रेनिंग दिले जात आहे.
मेरठमध्‍ये तीन आणि मुजफ्फनगरात पाच शिबिर
- हिंदू स्वाभिमान संघटनेच्‍या नेत्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, जे लोक यामध्‍ये प्रशिक्षण घेत आहेत ते सर्व 8 ते 30 वयोगटातील आहेत.
- ''आम्‍ही सुरुवातीला प्रशिक्षण देत आहोत. यामध्‍ये त्‍यांना शस्‍त्र चालवणे शिकवले जात आहे. शिवाय भविष्‍यात काय होईल, हे सांगत आहोत'', अशी माहितीसुद्धा या नेत्‍याने दिली.
- एका दुसऱ्या नेत्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, या दोन वर्षांत 15,000 लोकांना प्रशिक्षण दिले गेले.

पुढील स्लाइडवर वाचा, पोलिसांना काहीही माहित नाही...