आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 SIMI Terrorist Arrested In Raipur, Divyamarathi

छत्तीसगडमध्ये वर्षभरात 16 सिमी हस्तकांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- गेल्या वर्षभरात प्रतिबंधित सिमी संघटनेच्या 16 हस्तकांना अटक करण्याची मागणी गृहमंत्री रोमसवाक पैकरा यांनी बुधवारी विधानसभेत दिली. कॉँग्रेसचे आमदार उमेश पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नावर पैकरा यांनी वरील माहिती लेखी उत्तरात दिली.

सिमीच्या 16 हस्तकांना रायपूरमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बेकायदा कामात सहभाग, शस्त्र कायद्याअंर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे उमेर सिद्दिकी, अब्दुल वाहिद, अब्दुल अजीज, मोईनुद्दीन, अजिजुल्ला , रोशन ऊर्फ जावेद, हयात खान, शेख हबिबुल्लाह, मोहंमद दाऊद, अझरुद्दीन कुरेशी, मोहंमद सईद आणि शेर अली यांचा समावेश आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बोधगया आणि पाटण्यातील स्फोटप्रकरणी उमेर सिद्दिकी आणि अब्दुल वाहीची कोठडी मागितली आहे.