आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाचा ठसा! आयआयटीच्या तयारीवर १६ वर्षांच्या ‘दिव्य’ने लिहिले २७२ पानांचे पुस्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगर-माळवा - अवघे १६ वर्षे वय असलेल्या दिव्य गर्ग या मध्य प्रदेशातील आगरच्या विद्यार्थ्याने आयआयटीच्या तयारीवर २७२ पानांचे पुस्तक लिहिले आहे. ‘लाइफ अ‍ॅट द रेस टू आयआयटी’ असे त्या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात तयारीच्या महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. दिव्यने आयआयटीची तयारी करण्याचा प्रयत्न केला परंतु परीक्षेच्या तयारीसंबंधी संपूूर्ण माहिती असलेले एकही पुस्तक त्याला मिळाले नाही.
त्यामुळे दिव्यने आयआयटीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांशी संपर्क करून तयारी करताना येणा-या समस्या जाणून घेण्यात यश मिळवले. या पुस्तकात आर्यन आणि सिद्धांत या दोन मित्रांची कथा आहे. ते आयआयटीची तयारी करताना येणा-या समस्या सांगत यश संपादन करतात. दिव्यने मे २०१२ मध्ये हे पुस्तक लिहायला घेतले आणि वर्षभरानंतर मे २०१३ मध्ये ते पूर्णत्वास नेले.