आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील उपाहारगृहांत दररोज वाया जाते १६० लाख लिटर पिण्याचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दररोज देशभरातील उपाहारगृहांमध्ये आगंतुकांद्वारे (ग्राहक) पेल्यांमध्ये जेवढे पाणी सोडले जाते, त्यातून प्रतिदिवशी साधारण १६० लाख लिटर पाणी वाया जात आहे. वर्षभरात हा आकडा ५८४ कोटी लिटरवर पोहोचते. आंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च एजन्सी मार्केट सेपियन्स आणि दैनिक भास्करद्वारे केल्या गेलेल्या एका पाहणीत ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे. यासाठी आता दैनिक भास्कर फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एफएचआरएआय) यांच्यासह पुढाकार घेणार आहे. पुढाकाराअंतर्गत एफएचआरएआयशी संबंधित जवळपास ४००० हॉटेल्स व उपाहारगृहांत आगंतुकांना निवेदनासह अर्धा पेला एवढेच पाणी दिले (सर्व्ह केले) जाईल आणि आवश्यकता असेल तर त्यांना आणखीन पाणी पुन्हा दिले जाईल.
अशी झाली पाहणी : प्रतिदिन देशभरातील उपाहारगृहांमध्ये वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणाचा शोध लावण्यासाठी १५ प्रमुख शहरांतील १०५ उपाहारगृहांमध्ये जाऊन ही पाहणी केली गेली. या शहरांत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जयपूर, अमृतसर, पाटणा, अहमदाबाद, लुधियाना, हैदराबाद, लखनऊ, भुवनेश्वर, कोची आणि नागपूर या शहरांचा समावेश होता.
संशोधनात हे दिसले की उपाहारगृहातील प्रत्येक टेबलावरील आगंतुकास किती पेले आणि किती बाटली पाणी दिले गेले, आगंतुक म्हणजेच ग्राहक गेल्यानंतर याच पेले आणि बाटल्यांमधील वाचलेले पाण्याचे प्रमाण मोजले गेले. या सर्व प्रक्रियेत हे लक्षात आले की प्रत्येक ग्राहक सरासरी ७३ मिलिलिटर पाणी सोडून देतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सामान्यत: उपाहारगृहात उपयोगात आणलेल्या २०० मिलिलिटर आकाराच्या पेल्यांमध्ये एक तृतीयांशाहून अधिक प्रमाणात पाणी सोडून देतात. पाहणीनुसार एका उपहारगृहात दिवसभरात सरासरी २२४ लोक येतात. याप्रमाणे एका उपाहारगृहात प्रतिदिवशी जवळपास साडेसोळा लिटर पिण्याचे पाणी वाया जाते आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे केल्या गेलेल्या सहाव्या आर्थिक जनगणनेनुसार भारतात जवळपास ९.८१ लाख उपाहारगृहे आहेत. जर मार्केट सेपियन्सच्या संशोधनाच्या आधारावर या ९.८१ लाख उपाहारगृहांत वाया जाणाऱ्या पाण्याची मोजणी केली गेली, तर आपल्याला कळेल की दररोज देशभरातील उपहारगृहांमध्ये साधारणत: १६ एमएलडी (१६० लाख लिटर) पिण्याचे पाणी वाया जाते.
बातम्या आणखी आहेत...