आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्करच्या ६१ व्या आवृत्तीचे मुजफ्फरपूरमध्ये लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर: ‘दैनिक भास्कर’च्या मुजफ्फरपूर आवृत्तीचे शुक्रवारी लोकार्पण झाले. समूहाची ही ६१ वी आवृत्ती आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे प्रमुख अतिथी होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव अध्यक्षस्थानी होते. भाजप नेते सुशीलकुमार मोदी विशेष अतिथी होते. राज्यात निवडणुकीचे वातावरण असतानाही सर्व अतिथींनी या मंचाचा राजकीय वापर केला नाही. ‘दैनिक भास्कर’ने बिहारच्या विकासात भागीदार व्हावे, अशी अपेक्षा तिघांनीही व्यक्त केली. कार्यक्रमाला ‘दैनिक भास्कर’चे व्यवस्थापकीय संपादक जगदीश शर्मा, राज्य संपादक ओम गौड, बिझनेस हेड सोरेंद्र चटर्जी आणि पाटण्याचे निवासी संपादक प्रमोद मुकेश उपस्थित होते. ‘दैनिक भास्कर’च्या संपूर्ण बिहारमधील विस्ताराच्या मालिकेत मुजफ्फरपूर ही राज्यातील चौथी आवृत्ती आहे.
बातम्या आणखी आहेत...