आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये ढगफुट‍ीत 30 जणांचा मृत्यू; अतिवृष्टीमुळे नद्या कोपल्या, 25 बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिठोरगड/गोपेश्वर- उत्तराखंडमध्ये शुक्रवारी अस्मानी संकट कोसळले. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत झालेल्या ढगफुटीत किमान 30 जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण बेपत्ता आहेत. शेकडो घरे बुडाली आहेत. पिठोरगड चामोली जिल्ह्यास त्याचा सर्वाधिक फटका बसला. दोन तासांत 100 मिमी पावसाने अनेक गावांना अक्षरश: झोडपले.

भल्या पहाटेच ही घटना घडल्यामुळे अनेक गावकरी ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे. चामोली जिल्ह्यात मंदाकिनी नदीच्या प्रवाहात दोन घरे वाहून गेली. इतर घरेही धोक्याच्या पातळीवर आली आहेत. नंदप्रयाग परिसरातही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पिठोरगडमध्ये सकाळी दोन तासांत १०० मिमी पाऊस झाला. सात गावांना पावसाने झोडपून काढले. सिंघली गावातून पाच, तर थाल गावातून तीन मृतदेह ताब्यात घेण्यात आल्या आहेत. बचाव पथकाने काही तासांतच शोध कार्याला सुरुवात केली. लष्कर निमलष्करी दलाकडून मदतकार्य सुरू होते. सिंघली भागातून २५ जण बेपत्ता असल्याचे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन अधिकारी आर. एस. राणा यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक संकटामुळे अनेक भागांत चिखलमातीसह ढिगारे दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडले असावेत, असा अंदाज आहे. त्यासाठी आयटीबीपी एसडीआरएफचे जवान बचाव कार्यात सक्रिय झाले आहेत. परिस्थिती सावरण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत.

उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. काही तासांत होत्याचे नव्हते झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष
हवामान विभागाने गुरुवारीच उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. उत्तराखंडमधील नैनिताल, उधमसिंगनगर चंपावत जिल्ह्यात आगामी ७२ तास अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पावसाला सुरुवात झाली. म्हणूनच अंदाज खरा ठरला आहे. वेळीच काळजी घेण्यात आली असती तर प्राणहानी टाळता आली असती.

मृतांच्या नातेवाइकांना लाख
राज्यातील घडामोडींवर माझे बारकाईने लक्ष आहे. पीडितांना प्रत्येकी लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली. ते शुक्रवारी दिल्लीतून बोलत होते.
एकाच कुटुंबातील तीन जण दबले..
- नौलाडा भागात भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला आहे.
- टोपराधार दाफिलामध्ये दोन घरे कोसळल्याने तीन जनावरे ढिगार्‍याखाली ठार झाली आहेत.
- धारचुला भागात तीन व जौलजीबीमध्ये दोन पुल वाढून गेले आहेत.
- देहराडूनसह एकून 8 जिल्ह्यात रविवारपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बद्रीनाथ, केदारनाथसह अनेक महामार्ग ठप्प...
- भूस्खलनामुळे ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग ठप्प झाला आहे.
- शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तोता घाटात दरड कोसळली.
- मसूरी-थालदरम्यान मार्गावर अनेक वाहने अडकली आहेत.
- केदारनाथ व यमुनोत्री महामार्गावर हजारों लोक अडकले आहेत.
- चमोलीत गेल्या 24 तासांत 54 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, उत्तराखंडमधील हाहाकार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...