(फोटो: मुस्लिम धर्म स्विकारताना हिंदु)
आगरा- उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धर्मांतरावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्तता आहे. हिंदु बनलेल्या 17 जणांनी आज (शुक्रवार) पुन्हा मुस्लिम धर्म स्विकारला. या सगळ्यांनी 15 डिसेंबर 2014 रोजी हिंदु धर्म स्विकारला होता. परंतु, शुक्रवारी शहरातील एका विवाह सोहळ्यात सगळ्यांनी मुफ्ती अहले सुन्नत मुदर्स्सिर खान कादरी आणि तंजीम उलेमा अहले सुन्नतचे पदाधिकारी इस्लामुद्दीन कादरी यांच्याकडून मुस्लिम धर्म पुन्हा स्विकारला. आगरामधील महुअर लाठिया गावात ही घटना घडली.
दुसर्यांदा मुस्लिम धर्म स्विकारणार्यांमध्येे रहमत (70), मुलगा रवी उर्फ मोहम्मद आरिफ, पत्नी नफीसा, मुन्ना उर्फ अली मोहम्मद आणि पत्नी साजिया, राजू उर्फ शौकत आणि पत्नी सलमा, लियाकत आणि मुलांचा समावेश आहे. मुस्लिम धर्म पुन्हा स्विकारल्यानंतर जोडप्यांना दुसर्यांना निकाह करावा लागला.
'परिस्थितीमुळे बनलो हिंदु'धर्मांतर करणारे रहमत यांनी सांगितले, की तेव्हाची परिस्थिती फारच गंभीर होती. तसेच मुलाच्या हट्टामुळे हिंदु धर्म स्विकारला होता. हिंदु नेते लव शुक्ला यांनी आम्हाला राहाण्यासाठी जमीन देण्याचे आमिष दाखवल्याने होते. त्यामुळे हिंदु धर्म स्विकारावा लागल्याचे रहमत यांचा मुलगा मुन्ना उर्फ अली मोहम्मदने सांगितले.
रहमत यांचे कुटुंब गावातील सार्वजनिक जमिनीवरील छोट्याशा झोपडीत राहातात. डिसेंबर 2014 मध्ये ही जमीन दलितांना देण्याविषयी चर्चा सुरु होती. त्यामुळे आमच्यावर बेघर व्हायची वेळ आली होती. 'सगळे धर्मांतर करा, जमीन मिळून जाईल', असे लव शुक्ला यांनी म्हटले होते. परंतु शुक्ला यांनी दिलेल्या शब्द पाळला नसल्याचे मुन्ना उर्फ अली मोहम्मद सांगितले.
रहमत यांच्यासह 17 जणांनी हिंदु धर्म स्विकारल्यानंतर मुस्लिम नट बिरादरीने त्यांच्या बहिष्कार टाकला होता. समाजाच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासही बंदी घातली होती. परंतु, शुक्रवारी रसुलपूर येथे एका विवाह सोहळ्यात सगळे पोहोचले. त्यांना पुन्हा मु्स्लिम धर्म स्विकारण्यास सांगण्यात आले. रहमत यांच्या कुटुंबीयांनी मुस्लिम धर्म स्विकाण्यास सहमती दर्शवली आहे.
14 मे रोजी बोलावली पंचायत...
रहमत यांच्या कुटुंबातील 17 जणांनी पुन्हा मुस्लिम धर्म स्विकाण्यास सहमती दर्शवली आहे. यासाठी निर्णय घेण्यासाठी 14 मे रोजी पंचायत बोलवण्यात आली आहे. नट बिरादरीची ही पंचायत आहे. रहमत यांनी सांगितले की, त्यांचा संपूर्ण परिवार पुन्हा नट बिरादरीमध्ये सहभागी होण्यात तयार आहेत. पंचायत झाले गेले विसरुन बिरादरीत आम्हाला समाविष्ठ करून घ्यावे, अशी विनंतीही रहमत यांनी केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...