आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Years Old Girl Commit Suicide For Demand Of Toilet In Home

घरात शौचालय नसल्याने तरुणीची अात्महत्या, नामुष्कीमुळे उचलले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुमका - घरात शौचालय नसल्याने झारखंडच्या दुमका येथे १७ वर्षीय तरुणीने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे आईवडिल सक्षम असतानाही शौचालय बांधण्याबाबत गंभीर नव्हते. पोलिसांनुसार, खुशबू नावाची ही मुलगी बीएच्या प्रथम वर्षात शिकत होती.

प्रात:र्विधीसाठी रोज उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने तिला नामुष्कीजनक वाटत होते. ती घरी शौचालयाच्या मागणी करत असताना आम्ही घराची बाउंड्रीवॉल उभारली, असे तिच्या आईने सांगितले. खुशबूने महिनाभरापूर्वी मनरेगा अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी अर्जही भरून ठेवला होता. मात्र तो जमा करू शकली नाही.

घरात चार खोल्या आणि अंगण आहे. मात्र शौचालय बांधणे ही या कुटुंबाची प्राथमिकता नव्हती. दरम्यान, उपायुक्त राहुल सिन्हा यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच प्रशासनाला ग्रामीण व नागरी क्षेत्रात सर्व्हे करून शौचालय नसलेल्या घरांची माहिती देण्यात सांगितले आहे.