आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात युवराज पद्मनाभला मिळाली राजघराण्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानात सवाई मानसिंह यांच्या राजघराण्याचा प्रमुख म्हणून १८ वर्षीय युवराज पद्मनाभने सूत्रे स्वीकारली आहे. त्यामुळे माजी राजघराण्याचे ते अधिकृत मुखिया बनले आहेत. युवराज सज्ञान होण्याची राजघराण्याला दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. २०११ मध्ये महाराजा ब्रिगेडियर भवानीसिंह यांच्या निधनापासून हे पद रिक्त होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात २१ तोफांची सलामी देऊन झाली. घराण्याचा प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर पद्मनाभने दैनिक ‘भास्कर’शी बोलताना सांगितले की, मी लंडनला जाऊन आणखी पाच वर्षे उच्च शिक्षण घेणार आहे. तेथून परतल्यानंतर राजकारणात प्रवेश करण्याचा तसेच जयपूरचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला. साेहळ्यात त्यांनी महाराजा मानसिंह यांच्या काळापासून विशेष प्रसंगात वापरले जाणारे लॉकेट घातले होतेे. अासनावर बसलेल्या पद्मनाभ यांना ठाकूर व कुंवर यांनी नाणी भेट दिली.
राजवाड्यात रंगला पारंपरिक सोहळा : यानिमित्त जयगड या राजवाड्यात विशेष सोहळा रंगला होता. राजकुमारी गौरवीकुमारीने युवराज पद्मनाभचे औक्षण केले. नंतर जयगडच्या बागेतील हिरवळीवर जयपूरच्या पोलिस बँडने जयपूर अँथम वाजवून सलामी दिली. महाराजा भवानीसिंह यांना पुत्र नव्हता. त्यांनी त्यांची मुलगी दियाकुमारीचा मुलगा पद्मनाभ सिंहला दत्तक घेतले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राजवाड्यात रंगला पारंपरिक सोहळा
बातम्या आणखी आहेत...