आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अर्थ अवर\' दरम्यान भास्कर समुहाने वाचवली तब्बल १८९०. ८८ किलोवॅट वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - रविवारी आयोजित "अर्थ अवर'दरम्यान दैनिक भास्कर समूहाने आपल्या कोट्यवधी वाचकांना अनावश्यक दिवे बंद ठेवण्याचे केलेले आश्वासन तर यशस्वी ठरलेच. शिवाय, आपल्या देशभरातील कार्यालयांतही हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला.

विविध राज्यांतील दैनिक भास्करची कार्यालये आणि प्रिंटिंग प्रेसमध्ये अर्थ अवरच्या एका तासात तब्बल १८९०. ८८ किलोवॅट वीज वाचवण्यात आली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, चंदिगड, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार आदी राज्यांमधील दैनिक भास्कर समूहाचे कार्यालय आणि प्रिंटिंग प्रेसमध्ये अर्थ अवर लागू करण्यासाठी सुनियोजित योजना आखण्यात आली.
त्यानुसार, रविवारी रात्री ठीक ८ वाजून ३० मिनिटांनी अनावश्यक वीजप्रवाह बंद करण्यात आला.
विशेष म्हणजे वर्तमानपत्रांचे कामकाज हे मुख्यत्वे सायंकाळच्या वेळी सुरू होत असते आणि ते रात्री उशिरापर्यंत चालत असते. अशी स्थिती असूनसुद्धा १८९०. ८८ किलोवॅट अवर वीज वाचवण्यात दैनिक भास्कर समूहाला यश आले.
वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरच्या (WWF) "अर्थ अवर' या अभियानांतर्गत रविवारी रात्री ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान जगभरातील लोकांनी अनावश्यक वीज बंद ठेवण्याचा संदेश देण्यात आला होता. जागतिक तापमानवाढ आणि विजेच्या अपव्ययासंबंधी लोकांमध्ये जनजागृती आणणे हा डब्ल्यूडब्ल्यूएफ या संस्थेच्या अर्थ अवर या अभियानाच मुख्य उद्देश आहे. यंदापासून दैनिक भास्कर समूहसुद्धा डब्ल्यूडब्ल्यूएफच्या या उपक्रमाचा भाग बनला आहे अाणि पहिल्याच वर्षी समूहाने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात यश मिळवले.
बातम्या आणखी आहेत...