आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीशी खेळ जीवावर बेतला, स्टंट करताना होरपळून तरुणाचा मृत्यू, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीचा स्टंट करताना जलील. - Divya Marathi
आगीचा स्टंट करताना जलील.
हैदराबाद - एका टिव्ही रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्टंट करताना आग लागून होरपळल्याने एका तरुणाचा टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या स्टंटदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण शरिरावर आग लावण्याचा स्टंट करत होता. पण त्याने काहीही खबरदारी घेतली नाही, त्यामुळे तो आग लागून होरपळला आणि त्याचा मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव जलील असल्याची माहिती समोर येत असून ओल्ड सिटीतील बरकत परिसरातील तो रहिवासी आहे. 7 एप्रिलला एका स्टंटचा प्रयत्न करत असताना 19 वर्षीय जलीलचा मृत्यू झाला होता. जलीलने सुरुवातीला तोंडात रॉकेल घेऊन आगीचा भडका करण्याचा स्टंट यशस्वीपणे पूर्ण केला. पण त्यानंतर त्याने शरिरावर रॉकेल ओतले आणि शरिराला आग लावली. पण हा स्टंट करताना तो मोठ्या प्रमाणावर भाजला गेला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्टंटचा सराव नव्हता पण रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा VIDEO