आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरु: 19 वर्षांच्या युवतीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - दिवसाढवळ्या चालत्या बसमध्ये एका मुलीवर बलात्कार करुन तिल्या रस्त्यावर फेकून देण्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी बस चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी बंगळुरुमध्ये ही घटना घडली.

नेमके काय घडले
खासगी नर्सिंग होममध्ये काम करणारी 19 वर्षांची युवती कामावर जाण्यासाठी बसमध्ये चढली. तेव्हा बसमध्ये चालक आणि क्लिनरशिवाय कोणीच नव्हते. पीडितेने केलेल्या आरोपानूसार, चालकाने क्लिनरला ड्रायव्हर सिटवर बसविले आणि त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केले. या दरम्यान बसचे दार आणि खिडक्या बंद होत्या. बलात्कारानंतर दोन्ही आरोपींनी युवतीला रस्त्यावर फेकून ते फरार झाले.

चालत्या बसमध्ये झालेल्या अत्याचारानंतर उपचारांसाठी युवती हॉस्पिटलमध्ये गेली. तेथील स्टाफने मेडिकल चेकअप केल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बस चालकासह क्लिनरला अटक केली आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...