आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने पाकला दिले चोख प्रत्युत्तर, 2 सीमा चौक्या उडवल्या; 7 सैनिकांना घातले कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूंछ येथील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी पुन्हा गोळीबार केला. (फाईल) - Divya Marathi
पूंछ येथील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी पुन्हा गोळीबार केला. (फाईल)
जम्मू/नवी दिल्ली- पाकिस्तानने पूंछच्या कृष्णा घाटीमध्ये सीमेवर सोमवारी सकाळी ८.३० ला गोळीबार करत पुन्हा भ्याडपणाचा परिचय दिला अाहे. सकाळी पाकिस्तानने अाधी बीएसएफच्या चाैकीवर राॅकेट टाकले. त्यानंतर माेर्टारच्या माध्यमातून गोळीबार केला. यात जेसीओ नायब सुभेदार परमजीत सिंह अाणि बीएसएफचे हेड काॅस्टेबल प्रेम सागर शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीम (बैट) ने दाेन्ही शहिदांच्या शवावर वार करून त्यांचे 
शिर कापले. भारताने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्या. याच चौक्यांवरुन पाक सैनिकांनी कव्हर फायरिंग दिले होते. त्यासोबतच भारतीय सैनिकांनी 7 पाक सैनिकांना कंठस्नान घातले.

या घटनेत बीएसएफचा एक जवान शहीदही झाला अाहे. हल्ल्यानंतर सेना अाणि बीएसएफनेही कारवाईने उत्तर दिले. त्यानंतर भ्याड पाकिस्तानने फायरिंग बंद केली. यापूर्वीही मागील वर्षी नाेव्हेंबर महिन्यात माच्छिलमध्ये पाकिस्तानी सेनेने एका जवानाच्या शवासाेबत दुर्व्यवहार केला हाेता. त्यावेळी भारतीय सेनेच्या उत्तरी कमानने सांगितले हाेते की, पाकिस्तानच्या या दुर्व्यवहाराला उत्तर जरूर दिले जाईल. दरम्यान, पाकिस्तानी सेना प्रमुख कमर जावेद बाजवा रविवारीच ‘एलओसी’दाैरा करण्यासाठी येऊन गेले हाेते. 
 
बारूदी सुरुंग पसरवल्याची दिली होती सूचना
पाकिस्तानने बारूदी सुरुंग पसरवल्याची सूचना भारतीय सेनेला मिळाली. त्यानंतर १० जवान दाेन पोस्टच्या मध्ये पैट्रोलिंगसाठी गेले. जवान तारबंदी (तारबंदी एलओसीच्या मागे असते) पार करून २०० मीटर पुढे गेले हाेते. तेव्हाच सीमेपलीकडून रॉकेट अाणि ऑटोमेटिक हत्यारांच्या माध्यमातून गाेळीबार करण्यात अाला. 
 
दहशतवाद्यांचा कॅश व्हॅनवर हल्ला :  सायंकाळी कुलगाम मध्ये दहशतवाद्यांनी रोकड असलेल्या  एका व्हॅनवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- एप्रिलमध्ये ७ वेळा संघर्ष विराम ताेडला
​- केव्हा झाला शहिदांच्या पार्थिवासाेबत दुर्व्यवहार... 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...